शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०

बॅ. भास्करराव घोरपडे

हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध भवानी तलवार,कोहिनूर हिरा हिंदुस्तानला ब्रिटनकडून परत मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारे बॅ. भास्करराव घोरपडे वय ७२ यांचे अल्पशा आजाराने पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झाले.
गेली ३५ वर्ष ते लंडनमध्ये स्थायिक होते.प्रकृती अस्वास्थामुळे ६ महिन्यापूर्वी ते परत पुण्यात आले होते.सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
बॅ. घोरपडे यांचा जन्म तीन ऑक्‍टोबर १९३७ रोजी पुण्यात झाला. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथील शालेय शिक्षणानंतर कला शाखेची पदवी आणि अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए आणि लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात बीएस्सी पदवी त्यांनी संपादन केली. "इन्स ऑफ कोर्ट' या स्कूल ऑफ लॉ अँड लिंकोल्नस इन येथून त्यांनी "बॅरिस्टर'चा अभ्यासक्रम पूर्ण केला. "लॉर्ड जस्टिस हार्मन स्कॉलर' आणि "कपिला मेमोरिअल ऍवॉर्ड' या शिष्यवृत्त्यांचे ते मानकरी ठरले होते. इंग्लंड आणि वेल्स येथील न्यायालयात त्यांनी काम केले. "लंडन कोर्ट ऑफ आरबिट्रेशन'चे सदस्य, "रेस रिलेशन कमिटी ऑफ सिनेट'चे सदस्य, इंग्लंडमधील "इंडियन लॉयर्स असोसिएशन', "अभिनव महाराष्ट्र' या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तस्करीतून लंडनला गेलेल्या आणि तेथून भारतात परत आणलेल्या नटराजाच्या मूर्तीसाठी तमिळनाडू सरकारतर्फे बॅ. घोरपडे यांनी ब्रिटिश न्यायालयात दावा दाखल करून दाद मागितली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात आणण्यामध्ये घोरपडे यांना यश आले.

लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य असलेल्या लंडन येथील निवासस्थानी नीलफलक लावण्यासाठी बॅ. घोरपडे यांनी पुढाकार घेतला होता. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटीश सरकारने नाकारलेली 'बॅरीस्टर' पदवी मरणोत्तर मिळावी,यासाठी ब्रिटनमध्ये कायदेशीर लढा दिला.

अशा या लढवय्या आणि संस्कृतिप्रीय व्यक्तीस भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या मृतआत्म्यास शांती देवो.

९ टिप्पण्या:

  1. या लढवय्या आणि संस्कृतिप्रीय व्यक्तीस भावपूर्ण श्रद्धांजली!

    उत्तर द्याहटवा
  2. कित्येक जन्मले स्वराज्यात,
    पण तुमच्यासारखे मावळे नाही उरले स्वराज्यात,
    ज्यांनी परत दिली आम्हाला
    आमची शान असे तुम्हीच हो स्वराज्यात एक....
    बॅ. भास्करराव घोरपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

    उत्तर द्याहटवा
  3. मी नव्यानेच सहभागी झालोय ,मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  4. Tyaani mahaaraajanchyaa talavaaree sathi athak prayatn kele, tyana bhavpurn shraddhaanjali

    उत्तर द्याहटवा
  5. @"कल्पना"....... एक सुन्दर जग.

    मस्त ब्लॉग आहे तुमचा
    मराठीसाठी हे वापरा
    http://www.google.com/transliterate/indic/Marathi

    उत्तर द्याहटवा
  6. बॅ. घोरपडे यानि आपल काम केल ........ पण आता फुडे काय ?.......... भवानी तलवार ब्रिटनकडून परत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करणार ?

    उत्तर द्याहटवा