सोमवार, ४ जानेवारी, २०१०

पन्हाळगड... वैशिष्ट्यांनी परिपूर्ण

कोल्हापूरजवळचा पन्हाळगड हा अतिशय देखणा दुर्ग आहे.शिलाहार राजा दुसरा भोज याने पन्हाळगडाची बांधणी केली. बहमनी,आदिलशाही,मराठी,मुघल अशी त्याच्यावर सत्तांतरे झाली.त्यामुळे गडावर त्यांच्या शैलीतील वस्तू आहेत.शिवाजीमहाराज ज्यावेळी पहिल्यांदा पन्हाळगडावर गेले,त्यावेळी पलिते पेटवून रात्रभर तो दुर्ग पुन्हा पुन्हा पाहत होते.तीन दरवाजा,वाघ दरवाजा,इंग्रजांनी पाडलेला चार दरवाजा असे भव्य दरवाजे,अंधारबाव,सज्जाकोठी,पुसाटीचा बुरुज,बालेकिल्ला,अंबरखाने अशी कित्येक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
Baji Prabhu Deshpande Statue in Panhala FortImage by Ankur P via Flickr
सिद्दी जोहरच्या वेढ्यातून तेथूनच शिवप्रभू निघाले आणि विशालगडावर सुखरूप पोहचले.तीन दरवाजांचा द्वारसमूह अगदी आवर्जून पाहण्यासारखा आहे.पन्न्गालय,पद्मणाल,प्रणालक,पद्मालय अशी पन्हाळ्याची अनेक नावे प्रचिलित होती.
पन्हाळ्याशेजारचा डोंगरही बांधून काढला आहे.त्या दुर्गाचे नाव आहे 'पवनगड'.हा पन्हाळ्याचा उपदुर्ग आहे.पन्हाळ्यावर पाण्याची उत्तम व्यवस्था आहे.सोमालय नावाचा तलाव राजा भोजानेच बांधला आहे.त्याच्या काठावर असलेल्या सोमेश्वरला शिवाजीमहाराजांनी राजा शिलादार दुसरया भोजानेच लावलेल्या पांढरया चाफ्याच्या एक लक्ष फुलांचा अभिषेक केला होता.
ई.स.१६७३ मध्ये कोंडाजी फर्जदाने केवळ ६० माणसे दुर्गात उतरवून,शिंगे फुंकून,बाणांनी आदिलशाही माणसे टिपत पन्हाळगड काबीज केला.तो पन्हाळ्याच्या मोहिमेवर जाण्याच्या आधीच शिवाजीमहाराजांनी कोंडाजीच्या हातात सोन्याची कडी घातली होती.
पन्हाळ्याच्या बालेकील्ल्यालाही छोटासा खंदक क्वचितच आढळतात;पण पन्हाळगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अंबारखाने म्हणजेच धन्य साठवण्याची कोठारे.पन्हाळ्यावर अशी तीन बुलुंद कोठारे आहेत.काही लाख टन धान्य त्यात सहज आमवू शकेल.गंगाकोठी,यामुनाकोठी आणि सरस्वती अशी त्यांची नावे आहेत.
'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' नावाच्या एका शिवकालीन काव्यात या कोठारांची वर्णने आली आहेत.आजही ती कोठारे आपली भव्यता जपत उभी आहेत.त्यात गेले कि,त्यांच्या अवाढव्यतेची कल्पना येऊ लागते.इतर अनेक गडांवरच्या इमारती काळाच्या ओघात नष्ट झाल्या असतानाच पन्हाळगडावरची हि भव्य कोठारे कशी काय आपली अवस्था टिकवून आहेत,हे पाहिल्यावर आश्चर्य वाटावयास लागते.
Enhanced by Zemanta

४ टिप्पण्या:

 1. कोल्हापूर-रत्नागिरी प्रवासात पन्हाळगड नेहमी दिसतो वाटेत. लहानपणी शाळेच्या सहलीमुळे पन्हाळगडाला भेट दिली होती पण आत्ता काही आठवत नाही. खूप लहान होतो तेंव्हा. आत्ता जायला हवे कधीतरी.

  उत्तर द्याहटवा
 2. @सिद्धार्थ
  अरे खूप मस्त आहे तू आता परत एकदा जाऊन येरे.
  पन्हाळा ते विशालगड हा ट्रेक तर जबरदस्तच अनुभव आहे.आम्ही हा ट्रेक एका दिवसामध्ये पूर्ण केला होता.तो एक अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी.

  धन्यवाद :)

  उत्तर द्याहटवा
 3. बाजीप्रभू देशपांडे यांचे सारखा पोलादी पुरुष शिवाजीराज्याना मिळाला हे फार मोठे योगदान म्हणावे लागेल . कारण शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळा गडावरती सिधी जोहर च्या वेढ या मधून निसटले त्यावेळी गनिमांना पावनखिंडीत रोखण्याची जबाबदारी बाजीप्रभू वरती सोपवण्यात आली . आणि ती त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पावनखिंड लढवली त्यावेळी त्यांना आपला प्राण गमवावा लागला

  उत्तर द्याहटवा