शनिवार, २३ जानेवारी, २०१०

'साहेबांना' वाढदिवसाच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा!

आज बाळासाहेबांचा ८३ वा वाढदिवस. आई जगदंब त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी इच्छा.
बाळासाहेब हे अस एक व्यक्तिमत्व ज्याच्याकडे मी कधी वा कसा कर्षित होत गेलो हे माझे मलाही समजले नाही.त्यांचे 'मराठी' आणि 'हिंदुत्व' याच्यावरील प्रेम आणि विचार मला आकर्षित करून गेले असावेत परंतु त्यांचा 'एकवचनी' पण अधिक भावला. त्यांनी एखादी गोष्ट बोलली तर त्यापासून त्यांनी कधीही घुमजाव केले नाही.'मी असे बोललोच नाही' हे वाक्य मला बाळासाहेबांकडून कधीही ऐकायला मिळाले नाही.मी माझे त्यांच्याबद्दलचे मत माझ्या मागील 'शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय' या पोस्टमध्ये मांडलेच हे.अधिक काही लिहित नाही.

अशा माझ्या 'साहेबानांचा' आज वाढदिवस .
मागील आजारपणातून ते आता चांगल्या प्रकारे ठीक झाले आहेत वयामानाने त्यांना आता पहिल्यासारखी धावपळ करता येत नसली तरी त्यांची एक झलक हि मनाला एक वेगळेच समाधान देऊन जाते.मराठी मन आणि मराठी माती
तुम्हीच घडवलीत सोन्याची नाती ...

'हिंदवी पताका अस्मानी फडकती,
मराठी अस्मिता उन्नत होती
मराठी माथा श्रद्धेने झुकतो ,
मनी शिवरायांचा जयजयकार घुमतो !'

अशा माझ्या दैवताला
''हिन्दुह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा! ""

५ टिप्पण्या:

 1. बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेमका आजच्याच तारखेला माझा पण लग्नाचा वाढदिवस असतो, त्यामुळे कधिच विसरु शकत नाही हा दिवस..:)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. माझ्यातर्फे सुद्धा बाळासाहेबांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा...!

  - विशल्या!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. @kayvatelte

  अरे वाह तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा :)

  प्रत्युत्तर द्याहटवा