गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

जिना - फाळणीचे प्यादे आणि वजीरही

हिंदू - मुस्लीम दोन धार्मिक समूह नसून ती वेगवेगळी सांस्कृतिक राष्ट्रे आहेत आणि ती नाईलाजाने एकत्र राहत आहे हे ब्रिटीशांनी जाणले होते आणि या दोघांचे एकत्रीकरण त्यांच्या सत्तेला धोकादायक ठरू शकते म्हणून त्यांनी धर्माच्या आधारावर द्विराष्ट्र सिद्धांत मांडण्यास सुरवात केली होती.
१९०५ चा बंगाल फाळणीचा प्रयोग हा त्याचाच भाग होता आणि पाकिस्तान निर्मितीची बीजे त्यावेळीच पेरली गेली होती आणि त्यानंतर १९०६ साली 'मुस्लीम लीग' ची स्थापना होऊन त्याचा पाया रचला गेला होता.
देशाच्या फाळणीला फक्त ब्रिटीश जबाबदार नसून त्याकाळच्या राजकीय नेत्यांची सत्तेची महत्वकांक्षा हि जबाबदार होत्या.
हिंदुस्तानला तोडणारे जरी ब्रिटीश असले तरी त्या प्रक्रियेचे दलाल केवळ आणि केवळ लीगी मुस्लीम आणि त्यांचे नेते जीना होते.
खिलाफत चळवळीनंतर ज्या घटना घडल्या आणि १९३४ साली लंडनच्या रिट्झ हॉटेलमध्ये मुस्लीम नबाब आणि सामंतांची जी बैठक झाली त्यात पाकिस्तानचे नाव समोर आले.तेथे जीना हि उपस्थित होते.त्या
Quaid-e-Azam Muhammad Ali JinnahImage by Asif . Ali via Flickr
नंतरच्या परिस्थितीला कोण जबाबदार होते ?
याचा जर कोणी प्रामाणिक विचार केला तर ते जीना यांनाच दोषी मानतील.
१९३५ पर्यंत जीना स्वताच धार्मिक तत्वावर द्विराष्ट्र संकल्पनेची थट्टा करत होते.जीना कधीही इस्लामप्रेमी आध्यात्मिक मुसलमान नव्हते त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा जास्त होता त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले नाही धार्मिक रीतीरिवाज पाळले नाहीत.ते दारू पीत डुकराचे मांस हि खात असत.धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवले पाहिजे असे त्यांचे विचार होते.
१९३५ पर्यंत जीना स्वताला प्रथम देशाचे नागरिक आणि नंतर मुस्लीम समजत होते.मग त्यांच्यात अचानक असा बदल का झाला कि त्यांनी मुस्लीम लीगचे नेतृत्व स्वीकारून द्विराष्ट्र सिद्धांताचा घोष लावला.आणि 'पाकिस्तान' चे निर्माते झाले.
अहमपणा हा जीनाचा मूळ स्वभाव होता आणि ते १९३६ पासून कट्टर मुस्लिमांचे नेतृत्व स्वीकारून जोरात फाळणीच्या कामाला लागले.
१९४० साली त्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी हिंसक पाऊले उचलली.१९३६ ते १९४७ या काळात जीना हेच मुस्लीम लीगच्या केंद्रस्थानी होते आणि तेच पाकिस्तानचे जनक होते.
ब्रिटीश सरकारने जिनांना हिंदुस्तान फाळणीची 'सुपारी' दिली असे म्हंटले तरी चालेल.जीनांनी तत्कालीन ब्रिटीश सत्ताधार्यांची इच्छा पुरी केली होती.
सुपारी घेऊनच जीनांनी फाळणी केली असे म्हणायचे कारण कि तसे दस्ताऐवज ब्रिटीश लायब्ररीत आजही पाहण्यास मिळतात.
एखाद्या देशाला स्वतंत्र करायचे असेल तर जाता जाता त्याचे विभाजन करायचे हि ब्रिटीशांची जुनी पद्धत होती.
अमेरिकेला स्वातंत्र्य देताना केंनेडाची निर्मिती त्यांना लाभदायक ठरली यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांनी विभाजनाचा फोरमुला वापरला.
अरब प्राय्द्विपाचे अनेक तुकडे केले हिंदुस्तानचे विभाजन करणे त्यांच्यासाठी सोपेच होते.
हिंदुस्तान विभाजनाचे काम एक उच्चशिक्षित,इंग्रजी भाषेचा जाणकार आणि आधुनिक विचारसरणीचा हा माणूस( जीना ) करू शकतो हे ब्रिटीशानी हेरले होते.त्यासाठी त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ हि दिले होते.
ब्रिटीश लायब्ररीतील हे दस्तऐवज ६० वर्षानंतर जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत.त्यात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तानच्या फाळणीसाठी जीना यांना १९३५ पासून दरवर्षी ३० लाख रुपये गुप्तपणे देत होते!
या रकमेचे मूल्यमापन आजच्या पैस्यात केले तर ती रक्कम ९० कोटी रुपये होते!
१२ वर्षात जीनांनी ब्रिटीशांकडून किती रुपये उखाळले असतील याचा हिशोब न केलेलाच बरा.
यामुळेच १९३५ नंतर जीना यांचा गांधी आणि ब्रिटीश यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला असावा.
काही लोक जिनांना पंतप्रधान पदात रस नव्हता असे सांगण्याचा पर्यंत करतात असे होते तर जिनांना पदाची लालसा नव्हती तर पाकिस्तान निर्मिती नंतर स्वताच गव्हर्नर जनरल का बनले ?
कि पाकिस्तान मध्ये त्यासाठी कोणीही लायक नाही असे जीना समजत होते ?
पाकिस्तानची निर्मिती कोणी केली,याचे उत्तर जीना 'मी आणि माझ्या टाईपरायटरने!' असे द्यायचे.
जीना हे ब्रिटीशानच्या कुटील नीतीतून उत्पन्न झालेले एक पात्र आहे आणि पाकिस्तान हे त्यांच्या कुटील नीतीचे यश आहे.
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta

२३ टिप्पण्या:

  1. jina hech muli pakistanche janak aahet he trivar saty aahe..

    tatkalin british sarakarane tyancha purepur vapar karun ghetla...karan mulat" divide & rule" ha britishancha dharmach...

    vikram tumache he vaky atishay sundar aahe..
    "jina he britishanchya kutil nitich patr tar pakistan he tya kutil nitich yash aahe"

    hya don olitach sampurn bhavarth aahe..adhik sanagane nahi..

    jay maharashtra...!!!!!!

    उत्तर द्याहटवा
  2. @ starter......nice article frnd.....i agree with ur views.......pun waait hyacha wata ki ha jinna jheva asa karat hota theva RSS walyani kai kela ?

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त लिहिलय.
    वाचुन नविनच माहिती मिळाली.... सही... अशीच नव-नविन माहिती देत - लिहित - जा!

    उत्तर द्याहटवा
  4. @भुंगा
    धन्यवाद साहेब

    तुमचा अभिप्राय देत रहा तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आम्हाला

    उत्तर द्याहटवा
  5. ब्रिटीश सरकारने जिनांना हिंदुस्तान फाळणीची 'सुपारी' दिली असे म्हंटले तरी चालेल.
    .
    आणि तत्कालिन कांग्रेस नेत्यांनाहि तेच हवे होते. जीनांचा वझीर नव्हे तर प्यादे म्हनुनच जास्त वापर करण्यात आला.
    .
    छान माहिती मिळाहि

    उत्तर द्याहटवा
  6. @Sachin_Gandhul
    हो प्यादे म्हणून जरी वापर केला असला तरी फाळणीचे ते वजीरच होते
    धन्यवाद सचिन

    उत्तर द्याहटवा
  7. केवळ एवढीच परिस्थिती असेल का फाळणीपूर्व??? जीना हे लोकमान्य टिळकांचे शिष्य... मी जीनांचे समर्थन करत नाहीये.. पण मुस्लिमांचे फाजील लाड करत त्यांना वेगळे महत्व देणारे गांधी ह्यांच्याबद्दल फाळणीच्या अनुषंगाने एकही वाक्य नाही???

    इतर वेळी उपोषण करणारे गांधी, फाळणीची सुरुवात होतेय ह्याकडे दुर्लक्ष करतात? सत्याग्रहाच्या आधारे जनसमुदाय एका छत्राखाली आणणा-या गांधींना फाळणीबाबत हतबलता यावी?? खिलाफत चळवळीला सहकार्य करणा-या गांधींनी मुस्लीमांपुढे हतबल व्हावे हेही पटत नाही..

    सुभाषबाबुंना वेगळा मार्ग का पत्करावा लागला?? कॉंग्रेस का सोडावी लागली??

    जीनांसारखा टिळक-शिष्य अचानक बदलावा? का बदलले जीना? काय घडले असे? टिळकांना गुरु मानले त्याहीवेळी तर इंग्रज होतेच की.. त्याहीवेळी इंग्रजांनी फितवण्याचे प्रयत्न केले असतीलच ना..

    फाळणीपूर्व घटनांचा नीट अभ्यास केल्याशिवाय कुणा एकाला दोष नाही देता येत... वरवर दिसतात तेवढे ’केवळ’ जीना दोषी असतील असे नाही.. इतर व्यक्तींचे स्वभावही कदाचित कारणीभूत असतील...

    उत्तर द्याहटवा
  8. @medhatai

    हो इतर व्यक्तींच्या हि राजकीय महत्वकांक्षा हि जबाबदार आहेतच यात वाद नाही
    परंतु १९३५ नंतर जिना का बदलेले असतील याचाही विचार करावा लागेल

    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  9. विक्रम एक अतिशय चांगला लेख लिहिला आहे.
    ब्रिटीशानी १९०५ साली बंगाल ची फाळणी करून फुट पाडायला सुरुवात केलि पण त्याची सुरुवात खुप आधी झाली होती. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात हिन्दू-मुस्लिम एकत्र आले होते ते मोठ्या प्रमाणावर पुन्हा होऊ नए यासाठी पुढच्या कालात ब्रिटीशानी फोडा आणि झोडा ही नीति वापरली. त्याच हेतूने त्यानी मुस्लिम नेत्याना स्वतंत्र महत्त्व द्यायला सुरुवात केलि. आगाखान याना एकमेव धार्मिक नेता बनाविन्यामागेही तेच षडयन्त्र होते.

    उत्तर द्याहटवा
  10. Vikram chan lihile ahes ..Jeena Yanchya Rajkiy Mahatvakanshe mule Eksangh Bharat vikhurala gela ani Hindu Muslim ya don Samudayamadhe Dari Tayar Zali..We have to think before that All whole peoples was struggling for freedom against English Force..That time there was no Hindu -Muslim.What is a condition now a days also .Indian Government is not concetrated on a Basic needs of comman Man.As POK and ARunachal Pradesh Boarders Pakistan and china are crossing there boarders and now a days china government is purposefully giving separate Visa Papers for Peoples from PO and Arunachal Pradesh.But Our Indian Leaders (Future Jeena'S) are not bothering about that,They are happy with fighting for votes and Partying..Nothing Else...
    Mala Ya Polotics muly kahi khare disat nahi deshache..God bless my Mother India..

    उत्तर द्याहटवा
  11. @pravin

    सर्वच सीमारेषांवरील सद्य स्थिती खूपच भयानक आहे आपण अतिशय योग्य मुद्दा मांडला धन्यवाद
    त्यावरही मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे

    उत्तर द्याहटवा
  12. खुप सेन्सिटिव्ह विषय आहे. तुम्ही निवडलेलं डायमेन्शन पण पटण्यासारखं आहे. माझा या विषयावर फारसा अभ्यास नाही.,पण आता वाचन सुरु करतोय.. पोस्ट माहितिपुर्ण आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. @Mahendra
    मी माझ्या माहितीप्रमाणे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  14. khupach chan lekh ahe...
    tumhi hi ji mahiti milavali ahe tich sandharbh ..kuthun ghetala tyachi link/pustakache nav dile tar bare hoel....

    उत्तर द्याहटवा