गेल्या १०-१५ दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मस्त पाऊस पडत आहे.कोणाला पावसात चिंब भिजायला आवडते तर कोणाला घरात बसून पावसाचा आनंद घेण्यात मजा येते.पाऊस म्हंटले कि गरम भजी आणि गरम गरम चहा हा आपला आवडता मेनू.प्रत्येकाचा पाऊस साजरा ?? करण्याचा प्रकार वेगवेगळा असतो.काही जुन्या आठवणी असतात काही मित्रांबरोबरच्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या सहवासाच्या अशाच काही खास आठवणी आपण आपल्या मराठी ब्लॉग विश्वातील मित्र आणि वाचकांबरोबर शेअर केल्या तर ?. कशी वाटते कल्पना ????
प्रत्येकाच्या मनाच्या तिजोरीत पावसाळ्याच्या आठवणी ह्या साठ्लेल्याच असतात चला तर हा आठवणींचा कप्पा आपल्या हौसी वाचकांसाठी खाली करूयात :)
(कृपया वाचकांनी आपल्या आठवणी प्रतिक्रियेच्या रुपात शेअर कराव्यात हि विनंती )
