विभाजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विभाजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

जिना - फाळणीचे प्यादे आणि वजीरही

हिंदू - मुस्लीम दोन धार्मिक समूह नसून ती वेगवेगळी सांस्कृतिक राष्ट्रे आहेत आणि ती नाईलाजाने एकत्र राहत आहे हे ब्रिटीशांनी जाणले होते आणि या दोघांचे एकत्रीकरण त्यांच्या सत्तेला धोकादायक ठरू शकते म्हणून त्यांनी धर्माच्या आधारावर द्विराष्ट्र सिद्धांत मांडण्यास सुरवात केली होती.
१९०५ चा बंगाल फाळणीचा प्रयोग हा त्याचाच भाग होता आणि पाकिस्तान निर्मितीची बीजे त्यावेळीच पेरली गेली होती आणि त्यानंतर १९०६ साली 'मुस्लीम लीग' ची स्थापना होऊन त्याचा पाया रचला गेला होता.
देशाच्या फाळणीला फक्त ब्रिटीश जबाबदार नसून त्याकाळच्या राजकीय नेत्यांची सत्तेची महत्वकांक्षा हि जबाबदार होत्या.
हिंदुस्तानला तोडणारे जरी ब्रिटीश असले तरी त्या प्रक्रियेचे दलाल केवळ आणि केवळ लीगी मुस्लीम आणि त्यांचे नेते जीना होते.
खिलाफत चळवळीनंतर ज्या घटना घडल्या आणि १९३४ साली लंडनच्या रिट्झ हॉटेलमध्ये मुस्लीम नबाब आणि सामंतांची जी बैठक झाली त्यात पाकिस्तानचे नाव समोर आले.तेथे जीना हि उपस्थित होते.त्या
Quaid-e-Azam Muhammad Ali JinnahImage by Asif . Ali via Flickr
नंतरच्या परिस्थितीला कोण जबाबदार होते ?
याचा जर कोणी प्रामाणिक विचार केला तर ते जीना यांनाच दोषी मानतील.
१९३५ पर्यंत जीना स्वताच धार्मिक तत्वावर द्विराष्ट्र संकल्पनेची थट्टा करत होते.जीना कधीही इस्लामप्रेमी आध्यात्मिक मुसलमान नव्हते त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा जास्त होता त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले नाही धार्मिक रीतीरिवाज पाळले नाहीत.ते दारू पीत डुकराचे मांस हि खात असत.धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवले पाहिजे असे त्यांचे विचार होते.
१९३५ पर्यंत जीना स्वताला प्रथम देशाचे नागरिक आणि नंतर मुस्लीम समजत होते.मग त्यांच्यात अचानक असा बदल का झाला कि त्यांनी मुस्लीम लीगचे नेतृत्व स्वीकारून द्विराष्ट्र सिद्धांताचा घोष लावला.आणि 'पाकिस्तान' चे निर्माते झाले.
अहमपणा हा जीनाचा मूळ स्वभाव होता आणि ते १९३६ पासून कट्टर मुस्लिमांचे नेतृत्व स्वीकारून जोरात फाळणीच्या कामाला लागले.
१९४० साली त्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी हिंसक पाऊले उचलली.१९३६ ते १९४७ या काळात जीना हेच मुस्लीम लीगच्या केंद्रस्थानी होते आणि तेच पाकिस्तानचे जनक होते.
ब्रिटीश सरकारने जिनांना हिंदुस्तान फाळणीची 'सुपारी' दिली असे म्हंटले तरी चालेल.जीनांनी तत्कालीन ब्रिटीश सत्ताधार्यांची इच्छा पुरी केली होती.
सुपारी घेऊनच जीनांनी फाळणी केली असे म्हणायचे कारण कि तसे दस्ताऐवज ब्रिटीश लायब्ररीत आजही पाहण्यास मिळतात.
एखाद्या देशाला स्वतंत्र करायचे असेल तर जाता जाता त्याचे विभाजन करायचे हि ब्रिटीशांची जुनी पद्धत होती.
अमेरिकेला स्वातंत्र्य देताना केंनेडाची निर्मिती त्यांना लाभदायक ठरली यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांनी विभाजनाचा फोरमुला वापरला.
अरब प्राय्द्विपाचे अनेक तुकडे केले हिंदुस्तानचे विभाजन करणे त्यांच्यासाठी सोपेच होते.
हिंदुस्तान विभाजनाचे काम एक उच्चशिक्षित,इंग्रजी भाषेचा जाणकार आणि आधुनिक विचारसरणीचा हा माणूस( जीना ) करू शकतो हे ब्रिटीशानी हेरले होते.त्यासाठी त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ हि दिले होते.
ब्रिटीश लायब्ररीतील हे दस्तऐवज ६० वर्षानंतर जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत.त्यात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तानच्या फाळणीसाठी जीना यांना १९३५ पासून दरवर्षी ३० लाख रुपये गुप्तपणे देत होते!
या रकमेचे मूल्यमापन आजच्या पैस्यात केले तर ती रक्कम ९० कोटी रुपये होते!
१२ वर्षात जीनांनी ब्रिटीशांकडून किती रुपये उखाळले असतील याचा हिशोब न केलेलाच बरा.
यामुळेच १९३५ नंतर जीना यांचा गांधी आणि ब्रिटीश यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला असावा.
काही लोक जिनांना पंतप्रधान पदात रस नव्हता असे सांगण्याचा पर्यंत करतात असे होते तर जिनांना पदाची लालसा नव्हती तर पाकिस्तान निर्मिती नंतर स्वताच गव्हर्नर जनरल का बनले ?
कि पाकिस्तान मध्ये त्यासाठी कोणीही लायक नाही असे जीना समजत होते ?
पाकिस्तानची निर्मिती कोणी केली,याचे उत्तर जीना 'मी आणि माझ्या टाईपरायटरने!' असे द्यायचे.
जीना हे ब्रिटीशानच्या कुटील नीतीतून उत्पन्न झालेले एक पात्र आहे आणि पाकिस्तान हे त्यांच्या कुटील नीतीचे यश आहे.
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta