हिंदुस्तान सरकारने नेहमीप्रमाणे तीव्र शब्दात या गोष्टीचा निषेध नोंदवला झाले. हा सगळा मला षंढपणा वाटतो.
काय आहे कोणत्याही हिंदूला हिंदूंच्या हत्तेचे दुख आता होतच नाही असे वाटते.त्यांना आता त्याची सवय झालीय.शीख - हिंदू यांनी इतिहासकाळापासून मुस्लीम धर्मांतेविरुद्ध कायमच तलवारी उपसल्या आहेत.धर्मासाठी बलिदान दिले आहे.त्याच धर्माचा शिरच्छेद होताना लोकांचे रक्त उसळत कसे नाही ?
फाळणीनंतर काय झाले मुस्लिमांसाठी 'पाकिस्तान' निर्माण झाले पण 'हिंदून'साठी हिंदुस्तान तयार झाले का ? नाही ...
देश निधर्मी ( सेक्युलर ? ) आहे असे सांगून हिंदुना कायम फसवण्यात आले आहे. या निधर्मीपणाच्या आडूनच आपले पंतप्रधान या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असे बिनदिक्त्तपणे म्हणू शकतात. मग हिंदुनी जायचे कुठे ? आज हिंदू -शीख यांचा पाकिस्तानात शिरच्छेद होत आहे आणि हिंदुस्तानात ते पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटात मारत आहेत.म्हणजे दोन्हीकडे मरण हिंदूंचेच .उठसुठ मानवाधिकाराची बांग देणारे पाकिस्तानात दोन हिंदू शिखांची हत्त्या झाल्यावर काय करत होते ? हिंदूंच्या अशा हत्त्या पाकिस्तानात नेहमीच होत असतात आणि त्याचे कोणालाच काही देणेघेणे राहिले नाही.
पण चूक कुणाची ? आपण 'हिंदू' आहोत याचा गर्व किंवा अभिमान हिंदूमध्ये राहिला आहे का ? आजकाल काहीनातर आपण हिंदू आहोत याचीही लाज वाटायला लागली आहे . मग याच्यापेक्षा वेगळे काय घडणार ? हिंदुना हिंदू म्हणून घेण्यात काय कमीपणा आहे हेच समजण्यापलीकडचे आहे.

'मुझे अपने को हिंदू कहलाना एक गाली सा लागता है' असे वक्तव्य काही दिवसापूर्वी हिंदीतील प्रसिद्ध लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांनी जयपुरात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात केले होते. वर्तमानपत्रांनी याला चांगली प्रसिद्धी दिली होती.हिंदू जेंव्हा हिंदूला काही बोलतो तेंव्हा या सो कौल्ड सेक्युलर मिडीयाला खूप मजा वाटते आणि ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी बनते.
'मी हिंदू असल्याची मला लाज वाटते' अशाप्रकारचे वक्तव्य काही वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री टी. आर.बालू यांनी ख्रिश्चनांच्या एका कार्यक्रमात केले होते. त्यावेळीही या हिंदूद्वेष्ट्या वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. विशेस म्हणजे या सर्व वर्तमानपत्रांचे संपादक हे हिंदूच होते.
पाकिस्तान आपला चांगला शेजारी आहे आणि त्याच्याशी आपण चांगलेच वागले पाहिजे असे सांगणारे आणि त्याला पाठींबा देणारे हिंदू या शीख हत्त्यांचा साधा निषेध करायला तरी पुढे येतील का ?
नाही कोणी येणार नाही हो
हे असाच चालू राहणार हिंदू मरत राहणार इथे नाहीतर तिथे ......कोणाला काही फरक पडत नाही
(टीप-यातील काही मुद्दे राउत यांच्या लेखातून घेण्यात आले आहेत )
जय हिंद !
जय महाराष्ट्र !