२-३ येळा त्यो त्याच्या जवळ बी आला हुता पण काही जमल नव्हत, पण आज त्यो जणू आपल्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा घालायसाठी आलाय अस वाटत हुत.
आन बघता बघता गड्याने रेकॉर्ड मोडल कि हो १९४ च आन २०० बी पुऱ्या केल्या तेबी नाबाद .
नादखुळा गणपतीपुळा
च्यामारी सामना बघताना सचिनच्या १५० झाल्यावर मी एका जाग्यावर बसून हुतु अजाबात हाललु नाय ती आपली मनाची चलबिचल आता याला कुणी अंधश्रद्धा म्हणू द्या नायतर काय बी म्हणू द्या आमासणी कायबी फरक पडत नाय.म्या अस नाय म्हणणार कि म्या एका जाग्यावर बसलू म्हनून त्याच्या २०० रणा झाल्या ;)
पण लय दिसाच स्वप्न गड्यान पूर केल
सच्याला नाव ठेवणार्यांनी हि खेळी बगावी आन आपल तोंड काळ कराव
जाऊ द्यात चांगल्या टायमाला वंगाळ नाय बोलत
या मराठमोळ्या सचिनला २००*(१४७) खेळीबद्दल मानाचा त्रिवार मुजरा !