मुस्लीम लीग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुस्लीम लीग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

जीना हे लोकशाही सरकारचे मारेकरी !

पाकिस्तानमध्ये लोकशाही का टिकत नाही ? तेथे थोड्या थोड्या कालावधीने लष्करी हुकुमशहा का येतात ?
या सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी आपण जेंव्हा जीनांच्या कारवायांवर दृष्टीक्षेप टाकतो तेंव्हा जाणवते कि दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच आहे.
आज ज्या पाकिस्तानला आपण पाहत आहोत तो फक्त हिंदुस्तानला तोडूनच बनवलेला नसून खुद्द पाकिस्तानच्या ज्या भागात निवडून आलेली सरकारे होती त्यानाही जीनांनी बरखास्त केले होते.
कैबिनेट मिशन ज्यावेळी हिंदुस्तानमध्ये येणार होते त्यावेळी ज्या प्रदेशात ज्या पक्षाची सत्ता असेल स्वातंत्र्यानंतर त्याच पक्षाकडे ते सत्ता देणार होते.
जीना फक्त मुस्लीम लीगची सत्ता आणू इच्छित होते त्यामुळे त्यांनी एक एक करून आपल्या मिळणाऱ्या भागातील ज्या पक्षाची सत्ता आहे ती एका झटक्यात समाप्त केली होती.
स्वतंत्र होण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये केवळ सिंध आणि बंगाल प्रांतात लीगची सत्ता होती.
Reply to the Welcome addressImage via Wikipedia
पंजाबमध्ये युनीयनिस्ट पार्टीचे आणि फ्रांटियरमध्ये कॉंग्रेस सरकार होते.बलुचिस्थानमध्ये २७ मार्च १९४७ रोजी जीनांनी भूदल आणि वायुदल पाठवून क्वेटावर ताबा मिळवला होता.बलुचींचे बंड पाक सैन्यांनी मोडून काढले होते.
पंजाबमध्ये हि मुस्लीम लीगचे सरकार यावे यासाठी आणि पंजाबचे तत्कालीन पंतप्रधान खिजर हयात खान हटवण्यासाठी जीना आणि त्यांच्या समर्थकांनी हयात खान यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले होते.
शेवटी खान यांनी राजीनामा दिला होता.
यावरून जीना यांनी जनतेने निवडून दिलेली सरकारे कशी बरखास्त करून लावली दिसून येते.
सीमावर्ती भागात हि अशाचप्रकारे सरकारे उलथून लावण्यात आली होती.त्यावेळी तेथे कॉंग्रेसचे सरकार होते.
खान अब्दुल गफार खान (गांधींचे कट्टर अनुयायी ) यांचे बंधू फ्रांटियरचे पंतप्रधान होते आणि आपले विलीनीकरण लीगमध्ये ह्वावे असे त्यांना वाटत नव्हते.
त्यावेळी सरहद्द गांधी (खान अब्दुल गफार खान) गांधीना म्हणाले होते ' महात्माजी,आम्ही जन्मभर आपल्यासोबत राहिलो आता का आम्हाला लांडग्या समोर टाकत आहात ? हिंदुस्तांमध्ये फ्रांटियरचे विलीनीकरण होत नसेल तर आम्ही आझाद पख्तुनिस्तान करू पण जीना बरोबर जाणार नाही' परंतु गांधीजीनी काही सहकार्य केले नाही.शेवटी फ्रांटियरवर लीगने घाला घातला.
त्यावेळी कॉंग्रेसचे अस मत होते कि हजारो मैल दूर असलेला एखादा भाग हिंदुस्तानचा भाग कसा होऊ शकतो.
सिंध मधेही अशीच परिस्थिती होती तेथील पंतप्रधान अल्लाबक्ष पाक मध्ये जाण्यास तयार नव्हते त्यांना वेगळा सिंधू देश हवा होता.परंतु नेहरू यांनी आझाद यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली. आणि त्यांनी नेहृच्या इशाऱ्यावर केवळ एका पानाचा अहवाल सदर केला.'सिंध जनता सिंधू देश बनवू इच्छित नाही.' नंतर जीनांनी अल्लाबक्ष यांची हत्त्या करवली.
या घटनांवरून असे दिसून येते कि जीना किती हुकुमशहा होते आणि लोकशाहीचे मारेकरी होते.हे त्यांना लोकशाहिवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.
आजची पाकिस्तानची परिस्थिती जरी पाहिली तरी असे दिसून येते कि तेथे लोकशाही अशी रुजलीच नाही.
थोड्याफार फरकाने तेथे लष्करशाही येत गेली आहे.
तालिबानी संकट त्यांच्या डोक्यावर सारखे गोंगावत आहे जे त्यांनीच तयार केले आहे
अल् कायदा,लष्कर-ए-तोयबा,जैश-ए-मोहंमद आदी अतिरेकी संघटनांच्या कारवाया अधिकाधिक धाडसी होऊ लागल्या आहेत.
तालिबान्यांचे युद्ध आणि पाकिस्तानात उद्भवलेली राजकीय आणीबाणी यामुळे पाकिस्तानची स्थिती आज खूप दयनीय झाली आहे.
पण दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच आहे त्याला कोण काय करणार.
(वरील लेखातील काही मुद्दे मुज्जफ़र हुसेन यांच्या लेखातील आहेत )
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

जिना - फाळणीचे प्यादे आणि वजीरही

हिंदू - मुस्लीम दोन धार्मिक समूह नसून ती वेगवेगळी सांस्कृतिक राष्ट्रे आहेत आणि ती नाईलाजाने एकत्र राहत आहे हे ब्रिटीशांनी जाणले होते आणि या दोघांचे एकत्रीकरण त्यांच्या सत्तेला धोकादायक ठरू शकते म्हणून त्यांनी धर्माच्या आधारावर द्विराष्ट्र सिद्धांत मांडण्यास सुरवात केली होती.
१९०५ चा बंगाल फाळणीचा प्रयोग हा त्याचाच भाग होता आणि पाकिस्तान निर्मितीची बीजे त्यावेळीच पेरली गेली होती आणि त्यानंतर १९०६ साली 'मुस्लीम लीग' ची स्थापना होऊन त्याचा पाया रचला गेला होता.
देशाच्या फाळणीला फक्त ब्रिटीश जबाबदार नसून त्याकाळच्या राजकीय नेत्यांची सत्तेची महत्वकांक्षा हि जबाबदार होत्या.
हिंदुस्तानला तोडणारे जरी ब्रिटीश असले तरी त्या प्रक्रियेचे दलाल केवळ आणि केवळ लीगी मुस्लीम आणि त्यांचे नेते जीना होते.
खिलाफत चळवळीनंतर ज्या घटना घडल्या आणि १९३४ साली लंडनच्या रिट्झ हॉटेलमध्ये मुस्लीम नबाब आणि सामंतांची जी बैठक झाली त्यात पाकिस्तानचे नाव समोर आले.तेथे जीना हि उपस्थित होते.त्या
Quaid-e-Azam Muhammad Ali JinnahImage by Asif . Ali via Flickr
नंतरच्या परिस्थितीला कोण जबाबदार होते ?
याचा जर कोणी प्रामाणिक विचार केला तर ते जीना यांनाच दोषी मानतील.
१९३५ पर्यंत जीना स्वताच धार्मिक तत्वावर द्विराष्ट्र संकल्पनेची थट्टा करत होते.जीना कधीही इस्लामप्रेमी आध्यात्मिक मुसलमान नव्हते त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा जास्त होता त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले नाही धार्मिक रीतीरिवाज पाळले नाहीत.ते दारू पीत डुकराचे मांस हि खात असत.धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवले पाहिजे असे त्यांचे विचार होते.
१९३५ पर्यंत जीना स्वताला प्रथम देशाचे नागरिक आणि नंतर मुस्लीम समजत होते.मग त्यांच्यात अचानक असा बदल का झाला कि त्यांनी मुस्लीम लीगचे नेतृत्व स्वीकारून द्विराष्ट्र सिद्धांताचा घोष लावला.आणि 'पाकिस्तान' चे निर्माते झाले.
अहमपणा हा जीनाचा मूळ स्वभाव होता आणि ते १९३६ पासून कट्टर मुस्लिमांचे नेतृत्व स्वीकारून जोरात फाळणीच्या कामाला लागले.
१९४० साली त्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी हिंसक पाऊले उचलली.१९३६ ते १९४७ या काळात जीना हेच मुस्लीम लीगच्या केंद्रस्थानी होते आणि तेच पाकिस्तानचे जनक होते.
ब्रिटीश सरकारने जिनांना हिंदुस्तान फाळणीची 'सुपारी' दिली असे म्हंटले तरी चालेल.जीनांनी तत्कालीन ब्रिटीश सत्ताधार्यांची इच्छा पुरी केली होती.
सुपारी घेऊनच जीनांनी फाळणी केली असे म्हणायचे कारण कि तसे दस्ताऐवज ब्रिटीश लायब्ररीत आजही पाहण्यास मिळतात.
एखाद्या देशाला स्वतंत्र करायचे असेल तर जाता जाता त्याचे विभाजन करायचे हि ब्रिटीशांची जुनी पद्धत होती.
अमेरिकेला स्वातंत्र्य देताना केंनेडाची निर्मिती त्यांना लाभदायक ठरली यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांनी विभाजनाचा फोरमुला वापरला.
अरब प्राय्द्विपाचे अनेक तुकडे केले हिंदुस्तानचे विभाजन करणे त्यांच्यासाठी सोपेच होते.
हिंदुस्तान विभाजनाचे काम एक उच्चशिक्षित,इंग्रजी भाषेचा जाणकार आणि आधुनिक विचारसरणीचा हा माणूस( जीना ) करू शकतो हे ब्रिटीशानी हेरले होते.त्यासाठी त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ हि दिले होते.
ब्रिटीश लायब्ररीतील हे दस्तऐवज ६० वर्षानंतर जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत.त्यात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तानच्या फाळणीसाठी जीना यांना १९३५ पासून दरवर्षी ३० लाख रुपये गुप्तपणे देत होते!
या रकमेचे मूल्यमापन आजच्या पैस्यात केले तर ती रक्कम ९० कोटी रुपये होते!
१२ वर्षात जीनांनी ब्रिटीशांकडून किती रुपये उखाळले असतील याचा हिशोब न केलेलाच बरा.
यामुळेच १९३५ नंतर जीना यांचा गांधी आणि ब्रिटीश यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला असावा.
काही लोक जिनांना पंतप्रधान पदात रस नव्हता असे सांगण्याचा पर्यंत करतात असे होते तर जिनांना पदाची लालसा नव्हती तर पाकिस्तान निर्मिती नंतर स्वताच गव्हर्नर जनरल का बनले ?
कि पाकिस्तान मध्ये त्यासाठी कोणीही लायक नाही असे जीना समजत होते ?
पाकिस्तानची निर्मिती कोणी केली,याचे उत्तर जीना 'मी आणि माझ्या टाईपरायटरने!' असे द्यायचे.
जीना हे ब्रिटीशानच्या कुटील नीतीतून उत्पन्न झालेले एक पात्र आहे आणि पाकिस्तान हे त्यांच्या कुटील नीतीचे यश आहे.
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta