अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

गरज कशाची अंधश्रद्धा निर्मुलन कायदा कि प्रबोधनाची ????

अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जातात हे आतापर्यंत दिसून आले आहे आणि त्याला समितीने वेळो वेळी उत्तर देण्याचा प्रयत्न हि केला आहे
या कायद्यातील काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नाहीत किंवा त्याच्या व्याख्या अधोरेखित करण्यात आल्या नाहीत उदाहणार्थ

'चमत्कार '
आता याची व्याख्या काय ते सांगितले नाही मग 'साई बाबा ' हे चमत्कार करत होते असे त्यांचे भक्त मानतात किंवा ते चमत्कार करत होते म्हणून त्यांना भक्त मानतात असे म्हणा हव तर मग ते अशा वेळी ते कायद्याच्या कचाट्यात येणार का ?
आणि असे झाले तर ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

किंवा आपल्या काही धर्मग्रंथांमध्ये काही बाबी चमत्कार म्हणून नोदावल्या गेल्या आहेत

The Law album coverImage via Wikipedia

आणि त्याच्यावरच आपल्या धर्मिक संस्था अवलंबून आहेत मग त्यावर हि गदा येणार का ?
किंवा जोतिष शास्त्राबद्दल यांची भूमिका काय का तेही गुन्हा ठरणार का ?
असे झाले तरपुन्हा ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

आणि जर कोणी हवेतून उदी, मौल्यवान वस्तू काढून दाखवणे ,मंतरलेले पाणी देऊन आजार बरे करणे असे करत असेलतर तो गुन्हा ठरू शकतो हे मान्य केलेतर त्याला प्रतिबंध करणारा कायदा आता अस्तित्वात नाही का ? तर आहे
उदाहरणार्थ: इंडियन पीनल कोडची अनेक कलमे उपयुक्त ठरू शकतात. भूतबाधा उतरवण्यासाठी जर कोणाला दोरखंडाने बांधले गेले तर आयपीसीच्या ३१९-३२९ कलमांचा वापर करता येईल. इजा केली गेली तर ३२०वे कलम, जीवितालाच धोका उद्भवला तर ३३६वे कलम, दैवी कोपाची भीती घालून एखाद्याला विशिष्ट विधी करण्याची सक्ती करण्यास ५०८वे कलम, सरकारी नोकराने असे प्रकार करण्याविरोधात ४९७वे कलम, फसवणुकीसाठी ४१७वे कलम अशी कलमे अस्तित्वात आहेत त्यांचा वापर करता येऊ शकेल.

किंवा यातच काही बदल करून हा कायदा अजून कडक करता अयू शकत नाही का ?

आता हे बघा
धामिर्क अध्यात्मिक प्रथांच्या नावाखाली दुष्ट प्रथा राबवणे हा या कायद्याच्या १० ११- कलमानुसार गुन्हा आहे. पण १३व्या कलमानुसार हानी पोहोचवणाऱ्या धामिर्क कृत्यांना वगळण्यात आले आहे.

'हानी पोहोचवणाऱ्या' म्हणजे नक्की काय ? आणि हे कोण ठरवणार ?

नरबळीची घटना घडली तर त्यासाठी ३०२ चे कलम आहे. फसवणुकीचा गुन्हा घडला तर ४२० चे कलम आहे. मग वेगळ्या कायद्याची आवश्यकता कशासाठी? फारतर आहे त्याच कायद्यात दुरुस्ती करता येईल.

या विधेयकात अंधविश्वास, आन्ध्श्राधा अज्ञान या संज्ञा, कुठचीही नेमकी व्याख्या करता वापरल्या आहेत.
तसेच तसेच प्रथा रूढी यातील फरक कुठेही स्पष्ट केलेला नाही.

अधिनियम १३ नुसार ''व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आथिर्क बाधा पोहोचणाऱ्या धामिर्क विधी कृत्यांना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही'', असे सांगणारे हे कलम बाधा पोहोचते की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा हे सांगत नाहि

'आदी शक्ती असल्याचे भासवून अथवा आदी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून' या उल्लेखातून विधेयक अशा शक्तींचे अस्तित्व मानते की नाकारते? ते नाकारण्याचा काही लोकांना अधिकार असेल तर ते मानणाऱ्यांचा अधिकारही मान्य करावा लागेल.


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बर्याच ठिकाणी गोंधळ उडतो

श्रद्धा हि एखाद्या माणसावर असू शकते , देवावर किंवा कामावर सुधा असू शकते किंवा प्रयत्न करूनही एखादी गोष्ट साध्य नाहि झाली तर येणाऱ्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्या श्रद्धेचा उपयोग होवू शकतो

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप पुसट रेषा असते श्रद्धा हि एक मर्यादा सोडून पुढे गेली कि ती अंधश्रद्धा बनते परंतु ती रेषा कोण ठरवणार ?
किंवा माझी श्रद्धा दुसर्या कोणाला अंधश्रद्धा वाटू शकते वा एखाद्याची अंधश्रद्धा मला श्रद्धा भासू शकते मग हे कोण ठरवणार कि श्रद्धा कि अंधश्रद्धा

त्यासाठी श्रद्धेमधील अंधश्रद्धा दूर करण्याची आवशकता आहे आणि ती प्रबोधन करून शक्य आहे नाकी कायदा करून

माणसाच्या सुखाच्या , जीवन जगण्याच्या किंवा राहण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात त्यात समिती हस्तक्षेप कशी काय करणार ?

आकाशात चमकणाऱ्या विजेला घाबरून गुहेत पळणारा माणूस आज हस्तस्पर्शाने बटण दाबून विजेला आमंत्रित करतो किंवा तिची कार्यक्षमता संपवतो.
वीज हा आता चमत्कार उरलेला नाही, म्हणजेच ज्ञानाने माणसाच्या मनातील अज्ञानावर विजेचा झोत टाकल्यामुळेच तेथील अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला.
हेच तत्त्व एकुणात लक्षात घेतले तर जनमानसाचे शिक्षण आणि प्रशक्षण अव्याहत चालू ठेवणे आणि वैज्ञानिक सूत्रांचा जीवनातील पडताळा अधिक सहजतेने होईल यासाठी आवश्यक असलेले तंत्र विकसित करून त्याला माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे, म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे.

यातील मुद्दे वेळवेगळ्या लेखातून घेतले आहेत
विक्रम
Reblog this post [with Zemanta]