शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

गरज कशाची अंधश्रद्धा निर्मुलन कायदा कि प्रबोधनाची ????

अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जातात हे आतापर्यंत दिसून आले आहे आणि त्याला समितीने वेळो वेळी उत्तर देण्याचा प्रयत्न हि केला आहे
या कायद्यातील काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नाहीत किंवा त्याच्या व्याख्या अधोरेखित करण्यात आल्या नाहीत उदाहणार्थ

'चमत्कार '
आता याची व्याख्या काय ते सांगितले नाही मग 'साई बाबा ' हे चमत्कार करत होते असे त्यांचे भक्त मानतात किंवा ते चमत्कार करत होते म्हणून त्यांना भक्त मानतात असे म्हणा हव तर मग ते अशा वेळी ते कायद्याच्या कचाट्यात येणार का ?
आणि असे झाले तर ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

किंवा आपल्या काही धर्मग्रंथांमध्ये काही बाबी चमत्कार म्हणून नोदावल्या गेल्या आहेत

The Law album coverImage via Wikipedia

आणि त्याच्यावरच आपल्या धर्मिक संस्था अवलंबून आहेत मग त्यावर हि गदा येणार का ?
किंवा जोतिष शास्त्राबद्दल यांची भूमिका काय का तेही गुन्हा ठरणार का ?
असे झाले तरपुन्हा ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

आणि जर कोणी हवेतून उदी, मौल्यवान वस्तू काढून दाखवणे ,मंतरलेले पाणी देऊन आजार बरे करणे असे करत असेलतर तो गुन्हा ठरू शकतो हे मान्य केलेतर त्याला प्रतिबंध करणारा कायदा आता अस्तित्वात नाही का ? तर आहे
उदाहरणार्थ: इंडियन पीनल कोडची अनेक कलमे उपयुक्त ठरू शकतात. भूतबाधा उतरवण्यासाठी जर कोणाला दोरखंडाने बांधले गेले तर आयपीसीच्या ३१९-३२९ कलमांचा वापर करता येईल. इजा केली गेली तर ३२०वे कलम, जीवितालाच धोका उद्भवला तर ३३६वे कलम, दैवी कोपाची भीती घालून एखाद्याला विशिष्ट विधी करण्याची सक्ती करण्यास ५०८वे कलम, सरकारी नोकराने असे प्रकार करण्याविरोधात ४९७वे कलम, फसवणुकीसाठी ४१७वे कलम अशी कलमे अस्तित्वात आहेत व त्यांचा वापर करता येऊ शकेल.

किंवा यातच काही बदल करून हा कायदा अजून कडक करता अयू शकत नाही का ?

आता हे बघा
धामिर्क व अध्यात्मिक प्रथांच्या नावाखाली दुष्ट प्रथा राबवणे हा या कायद्याच्या १० व ११- अ कलमानुसार गुन्हा आहे. पण १३व्या कलमानुसार हानी न पोहोचवणाऱ्या धामिर्क कृत्यांना वगळण्यात आले आहे.

'हानी न पोहोचवणाऱ्या' म्हणजे नक्की काय ? आणि हे कोण ठरवणार ?

नरबळीची घटना घडली तर त्यासाठी ३०२ चे कलम आहे. फसवणुकीचा गुन्हा घडला तर ४२० चे कलम आहे. मग वेगळ्या कायद्याची आवश्यकता कशासाठी? फारतर आहे त्याच कायद्यात दुरुस्ती करता येईल.

या विधेयकात अंधविश्वास, आन्ध्श्राधा व अज्ञान या संज्ञा, कुठचीही नेमकी व्याख्या न करता वापरल्या आहेत.
तसेच तसेच प्रथा व रूढी यातील फरक कुठेही स्पष्ट केलेला नाही.

अधिनियम १३ नुसार ''व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आथिर्क बाधा न पोहोचणाऱ्या धामिर्क विधी व कृत्यांना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही'', असे सांगणारे हे कलम बाधा पोहोचते की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा हे सांगत नाहि

'आदी शक्ती असल्याचे भासवून अथवा आदी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून' या उल्लेखातून विधेयक अशा शक्तींचे अस्तित्व मानते की नाकारते? ते नाकारण्याचा काही लोकांना अधिकार असेल तर ते मानणाऱ्यांचा अधिकारही मान्य करावा लागेल.


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बर्याच ठिकाणी गोंधळ उडतो

श्रद्धा हि एखाद्या माणसावर असू शकते , देवावर किंवा कामावर सुधा असू शकते किंवा प्रयत्न करूनही एखादी गोष्ट साध्य नाहि झाली तर येणाऱ्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्या श्रद्धेचा उपयोग होवू शकतो

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप पुसट रेषा असते श्रद्धा हि एक मर्यादा सोडून पुढे गेली कि ती अंधश्रद्धा बनते परंतु ती रेषा कोण ठरवणार ?
किंवा माझी श्रद्धा दुसर्या कोणाला अंधश्रद्धा वाटू शकते वा एखाद्याची अंधश्रद्धा मला श्रद्धा भासू शकते मग हे कोण ठरवणार कि श्रद्धा कि अंधश्रद्धा

त्यासाठी श्रद्धेमधील अंधश्रद्धा दूर करण्याची आवशकता आहे आणि ती प्रबोधन करून शक्य आहे नाकी कायदा करून

माणसाच्या सुखाच्या , जीवन जगण्याच्या किंवा राहण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात त्यात समिती हस्तक्षेप कशी काय करणार ?

आकाशात चमकणाऱ्या विजेला घाबरून गुहेत पळणारा माणूस आज हस्तस्पर्शाने बटण दाबून विजेला आमंत्रित करतो किंवा तिची कार्यक्षमता संपवतो.
वीज हा आता चमत्कार उरलेला नाही, म्हणजेच ज्ञानाने माणसाच्या मनातील अज्ञानावर विजेचा झोत टाकल्यामुळेच तेथील अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला.
हेच तत्त्व एकुणात लक्षात घेतले तर जनमानसाचे शिक्षण आणि प्रशक्षण अव्याहत चालू ठेवणे आणि वैज्ञानिक सूत्रांचा जीवनातील पडताळा अधिक सहजतेने होईल यासाठी आवश्यक असलेले तंत्र विकसित करून त्याला माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे, म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे.

यातील मुद्दे वेळवेगळ्या लेखातून घेतले आहेत
विक्रम
Reblog this post [with Zemanta]

बुधवार, २ सप्टेंबर, २००९

डिप्लोमॅटीक . . .

डिप्लोमॅटीक . . .
" यार तु फार डिप्लोमॅटीक आहेस.'' यासारखं डिप्लोमॅटीक दुसरं वाक्य नसेल. कारण खरंतर त्याला म्हणायचे असते की ... "साल्या... तु फार हरामी आहेस.'' तशी डिप्लोमसीची जर 'डीप्लोमॅटीक' व्याख्या करायची असेल तर त्याचा अर्थ होतो ... टॅक्टीकली वागने की जेणेकरुन त्यात सगळ्यांच हित साधलं जाईल. पण आजच्या काळानुसार डिप्लोमसीचा अर्थ होतो. .... "मुहं मे राम बगल में छुरी'. किंवा मनातली गोष्ट चेहऱ्यावर दिसू न देणे. काही लोक तर त्याच्याही पुढे जावून - ते मनात काही, चेहऱ्यावर काही, बोलण्यात काही, आणि आचरणात अजुनच काही, अशी वागतात. हं ही वेगळी गोष्ट आहे की त्याचे परीणाम मात्र वेगळेच काहीतरी होतात. आणि विश्वास ठेवा की आजचा काळच असा काही आहे की जर तुम्ही डिप्लोमॅटीक नसाल तर तुमचं काही खरं नाही. आता काय सांगायचं, की आपण कुणाशी मोकळेपणाने हसु पण शकत नाही. हसलात तर फसलात. कुणाशी जर चूकुन मोकळेपणाने हसलात तर तो तुम्हाला कुठेतरी नेवून बकऱ्यासारखं कापणार. काही दिवस तर तुम्ही हंसणं सुध्दा विसरुन जाल. कुणी हसलं तर काही जणांना वाटतं की अरे हा काय थील्लर माणूस आहे, मुर्खासारखा हसतो!. ऑफिसमध्ये हसु शकत नाही... कुण्या सुंदरीचं काम आपल्या गळ्यात पडण्याची शक्यता असते.... घरात हसू शकत नाही... खिसा रिकामा होण्याची भिती असते. त्यामुळेच कदाचित आजकाल लाफ्टर क्लबमध्ये लोकांची जरा जास्तच गर्दी जमत आहे.

मी असाच आज सकाळी सकाळी लाफ्टर क्लबकडे निघालो होतो. रस्त्याच्या पलिकडून एक माणूस येतांना दिसला. तसा तो नेहमीच लाफ्टर क्लबमध्ये दिसायचा. नजरानजर होताच मी त्याला एक गोड स्माईल दिलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानेही माझ्या गोड स्माईलला गोड स्माईलनेच उत्तर दिलं... कारण आजकाल असं फार कमी बघायला मिळतं.

" तुम्ही काय या कॉलनीत राहाता ? '' मी विचारलं.

" हो ... तुम्ही कुठे राहाता?'' त्याने विचारले.

" ते तिकडे तुमच्या शेजारच्याच कॉलनीत'' मी उत्तर दिलं.

एकाच बिल्डींगमध्ये समोरा समोर राहणारे शेजारीही जर अश्या गप्पा करु लागले... तर आजकाल आश्चर्य वाटायला नको.

गप्पा वाढता वाढता ... कुठे काम करता.... घरात कोण कोण काम करतं... पासून किती पॅकेज मिळतो इथपर्यंत जावून पोहोचल्या. मग इन्कम टॅक्सचा सरल फॉर्म भरला का? ... त्यात कोणतं डिडक्शन दाखवलं .. वैगेरे वैगेरे. त्या सरल फॉर्मच्या बाबतीत मला नेहमीच एक प्रश्न पडतो की ... इतक्या किचकट फॉर्मला सरल कोणत्या दृष्टीकोणातून म्हणतात काही कळत नाही.?

मग गप्पांचा विषय बदलून आज माणसाने किती प्रगती केली या विषयावर येवून थांबला. त्या माणसाचं म्हणणं होतं की आज माणूस चंद्राच्याही पुढे मंगळावर जाण्याचा विचार करतो आहे. फोन टीव्ही मोबाईल इन्टरनेट च्या सहाय्याने माणूस कितीही जरी दूर असला तरी क्षणात संपर्क होवू शकतो. वैगेरे वैगेरे....

मी म्हटलं ही कसली प्रगती? याला काय प्रगती म्हणतात? ...

एवढ्यात लाफ्टरक्लब आला आणि आमच्या गप्पा तेवढ्यापुरत्या थांबल्या...


आज लाफ्टर क्लबमधे दोन पाहूणे आले होते. ते सगळ्यांना वेगवेगळ्या व्यायामाचे प्रात्यक्षीक देवू लागले. सुरवातीला तर त्यांनी काही योगाच्या प्रकाराचे प्रात्यक्षीक दिले . मर्कटासन, हलासन... इत्यादी. त्यातले शवासन लोकांना सगळ्यात जास्त आवडलेले दिसले. मग त्यांनी पवनमुक्तासन शिकवलं.... काही लोकांनी पवनमुक्तासनाला त्याच्या नावारुपाप्रमाणे खरं करुन दाखविलं.... मी तर म्हणतो की पवनमुक्तासनाच्या नंतर लागलीच अनुलोम विलोम घ्यायला पाहिजे. म्हणजे पवनमुक्तासनानंतर वेगळं नाक दाबायला नको.

वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनाच्या प्रात्यक्षीका नंतर त्यातल्या एकाने गळ्यात पाय अडकविण्याचा प्रकार करुन दाखविला. तो प्रकार करतांना तो जोर जोराने ओरडत होता. ते त्याचं ओरडनं त्या योगासनाचा भाग नसुन खरोखरच त्याचे पाय त्याच्या मानेत अडकले होते हे आम्हाला मागावून जेव्हा त्याच्या साथीदाराने त्याचे पाय काढण्यासाठी त्याला मदत केली तेव्हा कळले.

सगळे प्रात्यक्षिकं करतांना ते लोक मधे मधे उत्सुकतेने पार्कच्या गेटकडे कुणाची तरी वाट पाहत आहेत असे बघत होते. ते असे का पहात आहेत हे आम्हाला नंतर कळले. नंतर त्यांनी शाळेत घेतात तसे पी.टी.सारखे वार्मीग एक्सरसाईजेस घेतले. उजवा हात वर करा... त्यांनी निर्देश दिला... आता उजवा हात नक्की कोणता हे बघण्यासाठी मिश्राजींनी बाजुच्याकडे पाहिले. तो त्याच्या बाजुच्याकडे पाहत होता. तिथे पांडेजी उभे होते. त्यांनी जेवण्याची ऍक्शन करुन बघीतली आणि पटकन आपला उजवा हात वर केला. आता जर त्यांनी डावा हात वर करा असा जर निर्देश दिला तर पांडेजी कोणती ऍक्शन करुन बघतील याची कल्पना ना केलेली बरी.

ते डेमोस्ट्रेशन देणारे मधे मधे पार्कच्या दरवाजाकडे का पाहत आहेत हे आम्हाला प्रेसवाले आल्यानंतर कळले. ते प्रेसवाले आल्यानंतर तर आम्ही एका बाजुला राहालो आणि ते डेमोस्ट्रेशन देणारे कॅमेऱ्याकडे बघुन निर्देश देवू लागले. अच्छा म्हणजे ही त्यांची डिप्लोमसी होती. मी पुन्हा डिप्लोमसीबद्दल विचार करु लागलो. आज डिप्लोमसी चा फैलाव एखाद्या रोगासारखा एवढ्या वेगाने कसा काय होत आहे? एखाद्या कॉलेजात डिप्लोमा इन डिप्लोमसी असा एखादा कोर्स तर चालवल्या जात नाही ना?

विचार करता करता एक्सरसाईज केव्हा संपलं काही कळलंच नाही. मी घरी जायला निघालो. पुन्हा माझ्यासोबत तो आधीचा जो मला रस्त्यात भेटला होता तो येवू लागला. अजुनही तो आमच्या मघाच्या प्रगतिविषयीच्या गप्पांवरच अडकलेला होता.

" आज मानवाने एवढी प्रगती केली तरी तुम्ही त्याला प्रगती मानत नाही असे मघा म्हणाला होतात..?' तो म्हणाला.

" हो '' मी म्हणालो.

" पण का?'' त्याने विचारले.

"बघा आज माणसावर अशी वेळ आली आहे की तो कुणाशी मोकळेपणाने हसुसुध्दा शकत नाही.... अणि त्या हसण्याची कमतरता पुर्ण करण्यासाठी त्याला अश्या लाफ्टरक्लबमध्ये जावून वेड्यांसारखं खोटं खोटं हसावं लागतं ... याला काय तुम्ही प्रगती म्हणणार... मी तर म्हणतो की यापेक्षा जास्त कोणती अहोगती नाही ...'' मी आवेशाने म्हणालो.

आम्ही पार्कच्या बाहेर येवून घरी जाण्यासाठी निघालो. तो माझ्यासोबतचा अजुनही शांत आणि विचारात मग्न दिसत होता. तो जरा जास्तच सिरीयस झालेला दिसत होता.

" अहो जास्त सिरीयसली घेवू नका ... मी आपला असाच बोललो... बाय द वे तुमची कोणती बिल्डींग आहे ...''

मी गोष्ट बदलून त्याला विचारले. त्याने एका बिल्डीगकडे इशारा करीत म्हटले, " ती बघा ती... फ्लॅट नं. सी202...''

"अच्छा तुम्ही त्या बिल्डींगमध्ये राहाता... मी बऱ्याच वेळा तिथे येत असतो... पुन्हा कधी आलो तर तुमच्याकडे जरुर येईन...'' मी म्हटलं.

" याना ...जरुर या ...'' त्याने म्हटले आणि तो एका गलीत जाण्यासाठी वळला.

माझं विचारचक्र पुन्हा सुरु झालं. डिप्लोमसीच्या बाबतीत...

डिप्लोमसी ज्याच्यावर बितते त्याला भलेही ती आवडत नसावी पण डिप्लोमसी एक कला आहे. त्यात खुप दुरचा विचार करावा लागतो. आता बघाना जो माझ्या सोबत होता त्याला काय माहीत की मी एक एल. आय. सी. एजंट आहे म्हणून ... आणि आता त्याला मी जाळ्यात ओढणे सुरु केले आहे म्हणून.... तो तर या गोष्टीपासून पुर्णपणे अनभिज्ञ आहे की हळू हळू दोन तिन दिवसात मी त्याच्याकडून कमीत कमी एकतरी एल आय सीची पॉलीसी घेतल्याशिवाय त्याला सोडणार नाही.

कुणी डिप्लोमसीला कला म्हणतो तर कुणाला, विशेषत: ज्यांच्यावर ती बितते त्यांना त्याचा तेवढाच तिटकारा असतो. पण हेही तेवढंच खरं आहे की देवही माणसासोबत मोठ्या चतुराईने डिप्लोमसी करतो. कारण देवाने कुणाला कमी तर कुणाला जास्त दिलं. तरीही त्याचे भक्त तेवढ्याच भक्तीभावाने त्याची पुजा करतात. देवासारखी डिप्लोमसी कदाचित कुणीही करु शकणार नाही. किंवा त्याच्यासारखी डिप्लोमसी केल्यावरच कदाचित काही माणसांनाही देव म्हटल्या जात असावं ...

- समाप्त -
सौजन्य- जयेश दौंडकर (By Mail)