रविवार, २१ फेब्रुवारी, २०१०

मधुकर सरपोतदार कालवश

शिवसेना वाढवण्यासाठी स्वत:ला झोकून देणारे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांनी पक्षावरची निष्ठा आपल्या कृतीतून पावलोपावली दाखवली. अलिकडेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वत:चा मुलगा आणि सून दुसऱ्या राजकीय पक्षातून लढत असताना सरपोतदारांनी मात्र शिवसेनेच्या कामात जराही खंड पडू दिला नाही.



रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आंजणारी गावात ३१ जानेवारी १९३४ साली मधुकर सरपोतदार यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉन्सन कंपनीमध्ये पसोर्नेल मॅनेजर या पदावर रूजू झाले. याच काळात त्यांनी अनेक शिवसैनिकांना नोकरला लावले. यातील अनेक पुढे शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या सरपोतदारांचे वक्तृत्वही उत्तम होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या सरपोतदार यांनी पक्षाच्या कामात झोकून दिले. कामगारांविषयी तळमळ असलेल्या सरपोतदारांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या मागण्यांसाठी दत्ताजी साळवी यांची भारतीय कामगार सेना एकीकडे रस्त्यावर उतरायची तर, कॉपोर्रेट क्षेत्रात उत्तम संबंध असलेले आणि फडेर् इंग्रजी बोलणारे सरपोतदार कंपन्यांच्या मालकांशी भांडून कामगारांना न्याय मिळवून देत.

आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या सरपोतदारांनी अनेक खटले स्वत:च्या अंगावर घेतले. मुंबईतील दंगलीदरम्यानचा त्यांचा किस्सा अनेकांच्या लक्षात राहणारा आहे. दंगल उसळली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोन नातवंडे बॉम्बे स्कॉटीश शाळेत होती. बाळासाहेबांची घालमेल सुरू झाली. त्यांच्या सुरक्षेसाठीची जीप नादुरुस्त झाल्याने पोलीस दुसरी जीप आणण्यासाठी गेले होते. अशावेळी सरपोतदार यांनी स्वत:ची गाडी काढली आणि ते बाळासाहेबांसोबत बॉम्बे स्कॉटीशला नातवंडांना आणायला गेले.

सरपोतदार यांचे चिरंजीव अतुल आणि सून शिल्पा यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अलिकडेच झालेली लोकसभा आाणि विधानसभा निवडणूक शिल्पा सरपोतदार यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली. घरात मुलगा आणि सून मनसेचा प्रचार करत असताना सरपोतदार मात्र शिवसेनेच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांच्या प्रचाराची धार कुठेही कमी पडली नाही. 

सौजन्य-मटा
९३ च्या दंगलीत गाडीत शस्त्र सापडल्याच्या आरोपावरून त्यांना १ वर्षाचा कारावास भोगावा लागला होता.

एक निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक स्व.मधुकर सरपोतदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!

२ टिप्पण्या:

  1. एक निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक स्व.मधुकर सरपोतदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  2. एक निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक स्व.मधुकर सरपोतदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली
    -vishal

    उत्तर द्याहटवा