शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

हिंदुत्वाचा तेजस्वी अविष्कार ... स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदुस्तानी स्वातंत्र्य युद्धाचे अग्रदूत,देशभक्तांचे अखंड स्फूर्तीस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी

मृत्यूशी अनेकवेळा झुंज  देऊन,त्याचा प्रभाव करून स्वातंत्र्यवीर आयुष्यात अनेकवार मृत्युंजय ठरले.संत ज्ञानेश्वर,तुकोबाराया आदी थोर योग्यांच्या परंपरेनुसार जीवित कार्यप्राप्तीनंतर वीस दिवसाच्या प्रयोपासानेनंतर केवळ पाण्यावर राहून आत्मसमर्पण करून सावरकर अनंतात विलीन झाले.२६ फेब्रुवारी १९६९ रोजी हा महापुरुष काळाच्या पडद्याआड गेला.

जातिभेदाच्या निर्मुलनाकरिता सावरकरांनी जे उपक्रम राबविले,त्यात शाळातून स्पृश्य व अस्पृश्य मुलांना एकत्रित बसविणे,सार्वजनिक पाणवठे,मंदिरे,उपहारगृहे येथे अस्पृश्यांना मुक्त प्रवेश मिळवून देणे,स्पृश्य-अस्पृश्य सहभोजन,तिळगुळ समारंभ इत्यादींचा  समावेश होता. रत्नागिरीमधील 'आखिल हिंदू पतित पावन मंदिर' हे हिंदुस्तानातील त्या काळातील एकमेव मंदिर होते जेथे स्पृश्य-अस्पृश्य यांना मुक्त प्रवेश होता.हिंदू समाजाला पुरोगामी विचारसारणीची व आधुनिक विज्ञाननिष्ठेची बैठक मिळवून देणाऱ्या सावरकरांच्या पुण्यतिथीनिम्मित्त त्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण करूया.

६ टिप्पण्या:

 1. सावरकरांचे कार्य हे श्रेष्ठतम होते, त्यांच्यातील सर्व सद्‍गुण जर आजच्या पिढीने अंगिकारले तर देशाच्या भवितव्याला नवी चालना मिळेल. त्यांची आज पुण्यतिथी, माझे त्यांना विनम्र अभिवादन.

  उत्तर द्याहटवा
 2. सावरकरांच्या पवित्र स्म्रुतीस अभिवादन!!!

  उत्तर द्याहटवा
 3. विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन !
  - vishal dixit

  उत्तर द्याहटवा
 4. सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांचे चरित्र सदैव प्रेरणादायी राहिल.

  उत्तर द्याहटवा
 5. स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आवर्जून पोस्ट टाकल्याबद्दल सर्वप्रथम आभार!! 'जेवढे महान तेवढेच दुर्लक्षित' अशा सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!

  उत्तर द्याहटवा