बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

रामजन्मभूमी खटला आणि निकाल

रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या ऐतिहासिक खटल्याचा निकाल येत्या 30 तारखेला लखनौ खंडपीठामध्ये ६० वर्षाच्या पदिर्घ कालावधीनंतर लागणार आहे.न्यायमूर्ती एस.यु.खान,डी.व्ही.शर्मा आणि सुधीर आगरवाल हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती निकाल देणार आहेत.जस जसा निकाल जवळ येत आहे तसे सरकारचे टेन्शन आणि  सामान्य लोकांच्यात उस्तुकता वाढत आहे. बाबरी पतनानंतर जशी परिस्थिती ओढवली होती तशी ओढवू नये म्हणून सरकार खबरदारी घेत असून सर्वाना शांततेचे आवाहन करत आहे.सर्व मिडीयाला आयताच विषय मिळाल्यामुळे तेथेही दिग्गजांच्या मुलाखतींच्या फैरी झडत आहेत.
 तसा हा निकाल अंतिम निकाल आहे असे म्हणता येणार नाही कारण या निकालानंतर निकाल ज्यांच्या विरोधात जाईल त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे.तेथे निकाल लागण्यासाठी किती काळ लागेल हे रामजाने. परंतु याधी सत्र न्यायालयात हिंदूंच्या बाजुनेने निकाल लागला होता.हि लढाई फक्त जागेची नाहीतर अस्मितेची आहे.रामाची जन्मभूमी आयोध्याच आहे का ? हे न्यायालयात पुरावे देऊन साबित करावे लागणार आहे.
 काही लोकांच्या मते या खटल्याचा निर्णय न्यायालाच्या बाहेर सामंजस्याने ह्वावा. किंवा तेथे एखादे  राष्ट्रीय स्मारक तयार करावे.परंतु  'रामजन्मभूमी' एकच असू शकते ती बदलता किंवा हटवता येणार नाही.विषय फक्त राममंदिराचा असता तर वेगळी गोष्ट होती  पण प्रश्न 'रामजन्मभूमीचा' आहे.
न्यायालय बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा निवाडा करू शकते का ???? कारण आयोध्या हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे.हिंदू बाकी कोणत्याहि  गोष्टीत एकत्र येतील न येतील परंतु अयोध्या हा असा एक विषय आहे ज्यात ते सर्व जातपात विसरून एकत्र येतात.
रामजन्मभूमी संदर्भातील पहिली केस महंत रघुबीर दास यांनी जानेवारी १९८५ साली दाखल केली होती.त्यानंतर २२ डिसेंबर १९४९ रोजी त्या जागेत रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.डिसेंबर १९५० मध्ये रामजन्मभूमी न्यासाच्या महंत रामचंद्र दास परमहंस यांनी मंदिर बांधणीसाठी केस दाखल केली अशा ऐकून ४ केसेस पेंडिंग आहेत त्यातील एक सुन्नी सेन्ट्रल ऑफ वक्फ यांची आहे. पुरातत्व  खात्याने जे उत्खनन केले आहे त्यात मंदिराचे अवशेष सापडले आहेत आणि ते न्यायालयात सादर हि करण्यात आले असावेत यावर न्यायलय योग्य ते निर्णय घेईलच.तोपर्यंत आपण वाट पाहूयात .आणि निर्णय रामजन्मभूमीच्या  बाजूने लागावा म्हणून प्रार्थना करूयात.

४ टिप्पण्या:

 1. मलाही तसेच वाटते...पण सर्व शांतातेत व्हावे.कारण हयामागे केलेल्या राजकारणात त्रास होतो तो सामान्य जनतेलाच...

  उत्तर द्याहटवा
 2. जे आहे ते स्पष्ट व्हावे, ती राम जन्म भुमी आहेच हे माहिती असुन सुद्धा आता पुन्हा कोर्टाने त्यावर शिक्का मोर्तब केल्यावर धर्मकंटकांनी अशांतता पसरवण्यात काही अर्थ नाही.

  उत्तर द्याहटवा
 3. mala ithe 2 mudde distata...1 mhanje ram janm bhoomi aani dusra mhanje mandir asanyacha ...aata hyatala pahila mudda jo aahe to hindunich ekatra yeun sodwayla hawa..court jo nikal deil tyacha tasa motha impact nasel..parantu dusra mudda jo aahe to mhanje mandir asnyacha to khup mahatvacha aahe aani jyacha imact khup dur dur paryant asel karan haa mudda hindu aaani musalman hya don dharmancha madhla aahe...nikal hindunchya bajune lagala kay kinva musalmanchya bajune lagala kaay..nikalacha impact jabardast asel hyat shankach nahiye.....

  उत्तर द्याहटवा
 4. मला एकच कळतं..
  ती रामजन्मभूमी आहे की नाही, हा वादाचा मुद्दा असूच शकत नाही! आणि रामजन्मभूमीच्या जागी मंदिर झालंच पाहिजे!
  मी अर्धाअधिक नास्तिक असूनही, मला हे जाणवतंय की जर निकाल मस्जिदीच्या बाजूनं लागला, तर नवीन जागांवरून वाद सुरू व्हायला वेळ लागणार नाही!

  उत्तर द्याहटवा