मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

भारतीय अभियांत्रिकीचे जनक

डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चीक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहल्ली या गावी १५ सप्टेंबर १७८६१ रोजी झाला. त्यांच्या वडलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकचम्मा होते.

डॉ.विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले.पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ मध्ये पदवी परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यानंतर ते मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर रुजू झाले.

१९८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'सक्कर' बंधाऱ्याची योजना केली.१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टीम शोधून काढली तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची रचना केली.
हैद्राबाद येथील 'मुसा' आणि 'ईसा' या नद्यांवर धरण बांधले.तसेच नदीच्या काठावर बाग बनवून पुरापासून शहराचे संवरक्षण केले.
म्हैसूरच्या राज्यांनी त्यांना संस्थांचे मुख्य अभियंता आणि नंतर दिवाण म्हणून नेमले होते.१९९२ साली डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली.

Bharatha Ratna Mokshagundam VishveshwaraiahImage via Wikipedia



डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान,दारिद्र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.
म्हैसूरमधील The Sandal oil Factory , The Metals Factory,The soap Factory,The crome tyning factory,Bhdravati Aryans and Steel Works हे सारे उद्योग त्यांच्या मेहनतीचे फलित आहेत.
त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटा यांनी टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.
बंगलोरमधील दि हिंदुस्तान एअरक्राफ्ट फेक्टरी आणि मुंबईची प्रीमियर हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे.

देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे,यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते.त्यांनी या विषयावर 'प्लांड इकोनोमी फॉर इंडिया' हे पुस्तक लिहिले आहे.
व्यापार आणि उद्योगधंदे वाढीसाठी त्यांनी 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना केली.

डॉ.विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी.लिट उपाधी मिळाल्या होत्या.
ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' उपाधीने गौरीवलेले तसेच १९५५ साली देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेन्द्रप्रसाद यांनी 'भारतरत्न' उपाधीने सन्मानित केले होते.तसेच त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशन हि करण्यात आले आहे.

देशात तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर हा 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो.



Reblog this post [with Zemanta]

रविवार, २७ सप्टेंबर, २००९

दसरा एक सुदिन

भारतीय प्रत्येक सणाला सामाजिक,सांस्कृतिक महत्व आहे त्याला दसरा हि अपवाद नाही.दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेल्या विजयाच स्मरण म्हणून दसरा साजरा केला जातो.
मराठ्यांनी दसर्याच्या मुहर्तावरच राज्याच्या सीमा ओलांडून देशाच्या विविध भागावर आपले निशाण फडकावले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने दसर्याचे विशेस महत्व आहे.

साडेतीन मुहर्तापैकी एक दसरा हा एक महत्वाचा मुहर्त आहे.नवरात्रीचे ९ दिवस देवीचा जागर केल्यानंतर विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. याच दिवशी मोठ्याप्रमाणात लोक आपल्या नवीन कामाचा शुभारंभ जादाकरून करतात.

प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी देवीची पूजा केली होती.रावणाचा वध के

Dasara Idol from Kundurumotte TempleImage via Wikipedia

ल्यावर त्याच्या आनंदप्रीत्यर्थ विजयादशमी वा दसरा साजरा केला जातो.त्यामुळेच हा सण दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेला विजय याचे प्रतिक आहे.
महिषासुर्मादिनीने महिषासुराचा वध केला याचे प्रतिक म्हणून हि हा सण साजरा केला जातो.

कोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.
'पवित्र सुदिन उत्तम दसरा' असा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे.

अशा या दसऱ्याच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छ्या.
या निमित्ताने समाजातील दृष्ट प्रवृतींवर चांगल्या वृतींचा विजय होवो हीच आई जगदंब चरणी प्रार्थना.

दसऱ्यानिम्मित पुन्हा सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा ...सोने घ्या सोन्यासारखे रहा.

Reblog this post [with Zemanta]

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

तरुण पिढी देशाला नवसंजवनी देईल?

भारतीय संविधानाची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे १९५१ पूर्वी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी एकसंध भारत निर्माण करणे हेच एकमेव ध्येय होते. संविधानात 'फेडरेशन ऑफ स्टेट' असा शब्द नसून 'युनियन ऑफ स्टेट' असा शब्द वापरण्यात आला आहे.
अमेरिकेमध्ये त्या प्रांताचे आणि राष्ट्राचे असे दुहेरी नागरिकत्व मिळते.आपण असे दुहेरी नागरिकत्व मान्य केले नाही.
आपल्या देशात एखादी व्यक्ती कोठेही राहत असलीतरी ती त्या प्रांताची नह्वे तर देशाची नागरिक असते.
स्वातंत्र्यानंतर भारताने काही प्रमाणत प्रगती जरी केली असलीतरी चित्र फार आशादायी वाटत नाही

ज्यांनी स्वतातंत्र संग्रामात भाग घेतला त्यांनी स्वराज्याचे एक स्वप्न पहिले होते.

natureImage by Per Ola Wiberg (Powi) via Flickr


आपल्या स्वराज्यात वस्तू गरजवंताला मिळतील, जो विकत घेऊ शकतो फक्त त्यालाच मिळणार नाहीत असे त्यांना वाटत होते
पण आज रोग्याला औषधे मिळेलच याची खात्री नाही पण रोग नसला तरी ते पैसेवाल्याला विकत घेता येते.

समाज गरजांवर आधारित राहील असे वाटत होते लालसेवर नाही

विकास आणि आधुनिकतेमुळे गरजा वाढतील, पण त्या कितीही वाढल्या तरी त्याला अंत आहे मर्यादा आहे .भोग लालसेला तर मर्यादाच नाही ती अमर्याद आहे.

संस्कृती २ प्रकारची राहील असे वाटले होते.एक त्यागावर आधारित आणि दुसरी भोगावर आधारित.
पण चंगळवाद आणि भोग लालसा यांनी संस्कृतीच संपवून टाकली आहे

आता भारतीयत्व म्हणजे काय आणि भारतीय संस्कृती कशाला म्हणतात हे ठरवणे हि कठीण झाले आहे.अशा भारताचे स्वप्न स्वतान्त्रासैनिकांनी नक्कीच पहिले नव्हते.

त्यांना वाटले होते सत्ताधार्यांपेक्षा समाजसेवकाची प्रतिष्ठा अधिक राहील असे वाटत होते पण सत्ताकांक्षेने सगळे भ्रम फुटले आहेत
आसाम, काश्मीर,अरुणाचल तुटतो आहे त्याचे तुकडे पडत आहेत अखंडता नेस्तनाबूत होत आहे
खंडित मूर्तीची पूजा करता येत नाही हे हि आपण 'भारतमाता' म्हणताना विसरत आहोत

परंतु निराश होउन कसे चालेल बदल तर करावाच लागेल
या देशात आता फक्त युवाच बदल घडवू शकतात म्हणून या युवाशक्तीवरच आता विश्वास उरला आहे

२ पिढ्यामधील अंतर म्हणजे काय हे सांगताना युनेस्कोच्या संचालकांनी म्हंटले होते ,'आजच्या प्रस्थापित जेष्ठ मंडीळीची अन्याय आणि भ्रष्टतेशी समझोते करून जगण्याची आणि ते सहन करण्याची क्षमता एकीकडे तर नवीन पिढी जी अन्याय आणि भ्रष्टाचार सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवू इच्छिते त्यांची अन्याय आणि भ्रष्टाचार सहन न करण्याची क्षमता दुसरीकडे या २ क्षम्तांमधील अंतर म्हणजे पिढ्यांमधील अंतर '

नवीन पिढी देशाला नव संजवनी देयील असे मला वाटते .


Reblog this post [with Zemanta]

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

पर्जन्यरोपण एक खरी गरज

नैऋत्य आणि ईशान्य मौसमी वारे दरवर्षी ११ हजार अब्ज घनमीटर आद्रता निर्माण करतात त्यापैकी २४०० अब्ज घनमीटरचे पावसात रुपांतर होते.
म्हणजे फक्त २२ % ढगांचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो बाकी ७८ % ढग हे पाऊस न पाडता नसता गडगडात करून निघून जातात.
आद्रतायुक्त ढग आपल्या डोक्यावर आले कि कुशलतेने आणि योग्य उपकरणांचा वापर करून जगातील ४५ पेक्षा जास्त देश आपल्या भूमीवर पाऊस पाडून घेतात आणि दुष्काळाच्या संकटापासून आपले सवरक्षण आज करतात
या देशामध्ये अमेरिका ,रशिया ,चीन ,इंडोनेशिया ,जपान ,इस्राएल ,मेक्सिको , अरब राष्ट्रे आणि दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा समावेश आहे.

Flying Lengends 09Image by lee_kmp via Flickr



आज एकट्या महाराष्ट्र राज्यातील शेती उत्त्पन ४० हजार कोटी आहे मग सर्व देशाचे किती अब्ज्य कोटी असू शकते याचा अंदाज न बांधलेलाच बरा
तरीही आपले सरकार दुष्काळ निर्वानासाठी काय करत आहे असा प्रश्न पडतो
दुष्काळजन्य परिस्थिती आल्यानंतर फक्त धावाधाव केली जाते
दुष्काळ निवारण समितीची स्थापना , सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठका ,पाणीटंचाई साठीच्या मार्गदर्शक सूचना यांचे पेव फुटले जाते.
परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा दुष्काळ हिसकावून घेतो त्याचे काय ?
यावर उपाय योजायला नकोत का ?

ऑस्ट्रीलीअन कौन्सिल ऑफ सायनटीफिक अन् इंडस्त्रियल रिसर्च ऑर्गनायजेशन यांनी नुकतेच जाहीर केले आहे कि त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ते १५ ते २० % पाणी दरवर्षी जास्त मिळवतात तसेच चीन ने केलेल्या उपाययोजनामुळे त्यांना ५० अब्ज्य घनमीटर पाणी मागील वर्षी अधिक मिळाले असून यातून ३६ हजार वैज्ञानिकांना काम हि मिळाले आहे.

दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी आंध्रप्रदेश मधील १५ जिल्ह्यांची निवड करून तेथे दरवर्षी सतत पाऊस पाडण्याचा निर्णय आणि कार्यक्रम हाती घेतला होता त्यावेळी ते म्हणाले होते कि ‘ पर्जन्याच्या अभावामुळे पडणारा दुष्काळ आम्हाला इतिहास जमा करायचा असून आम्ही आंध्रप्रदेश मध्ये मागील वर्षी १० जिल्ह्यात १८ दक्षलक्ष्य घनफूट पाणी विविध उपाययोजना करून अधिक मिळवले आहे.
तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी चीकीस्तकपणे पर्जन्यारोपानाची तयारी करावी आणि राज्याचा विकास करावा ’
हे असेच संपूर्ण हिंदुस्तानमध्ये का होऊ शकत नाही ?

चीनमध्ये दरवर्षी गारांच्या पाऊसामुळे खूप नुकसान होते परंतु चीनने आता गारांचे रुपांतर पाऊसात करण्याचे तंत्र विकसित केल आहे.
मागील वर्षी आपण चीन मधील ऑलिम्पिकच्या वेळीही चीनचे या क्षेत्रातील तंत्रज्ञान पाहिले होते आठवते का ?
ऑलिम्पिकवर पाणी पडू नये म्हणून बीजिंगकडे येणारे पाऊसाचे ढग अलीकडेच पाऊस पाडून निकामी करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले होते.

आपल्या देशातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ तसेच विकसित देह्साची मदत घेऊन आपण देशाची व राज्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन ढगांची DBZ क्षमता लक्षात घेऊन देशात भरपूर पाऊस पाडू शकतो (पाऊस पाडण्यासाठी ढगांची बाष्प कणांची DBZ क्षमता ४० असावी लागते )

जर ढगांतून नैसर्गिक पाऊस पडत नासेलतर त्यावर रासायनिक फवारणी करून पाऊस पाडता येऊ शकतो अशा ढगांची योग्य निवड अत्याधुनिक उपकरणांमुळे आता शक्य आहे फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे.

भूजल पातळी दरवर्षी १ ते ३ फुट खाली जात आहे हे कटू सत्य आहे
नद्या , नाले कोरड्या पडण्याची शक्यता, दुष्काळाचे सावट सतत देशावर असते अशावेळी सत्त्याधार्यांनी योग्यानियोजन करून पर्जन्यारोपानाचे महत्व जाणून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते.






Reblog this post [with Zemanta]

मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

5 star लोकप्रतिनिधी

आज भारतामधील सामान्य जनता गरिबी महागाई दुष्काळ यांनी होरपळत असताना
याच देशातील गांधीजींच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील मंत्री जनतेच्याच पैशावर मजा मारत आहेत.
यावरून असे दिसून येते कि गांधींचे विचार फक्त सांगायला आहेत आचरणात आणायला नाहीत असे त्यांचे मत आहे.

‘संधी मिळाली तर महात्मा गांधी यांच्याबरोबर भोजन घ्यायला आवडले असते ’ असे वक्तव्य अमेरिकाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच केले
त्याचवेळी गांधीजींच्या देशात त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षातील मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये ४० हजार रुपये प्रतिदिन भाडे मोजून जनतेच्या पैश्यावर ऐश करतानाचे

Five Star Hotel in San SalvadorImage via Wikipedia

वृत्त आले
या नेत्यांना लाज कशी वाटत नाही ?
अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षाला गांधींच्या साधेपणाचे विचार पटत असताना त्यांच्याच देशात मात्र त्यांच्या विचारणा हरताळ फासण्याचे काम सध्या चालू आहे आणि यात लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत
परराष्ट्रमंत्री एस म कृष्णा आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांनी जनतेच्या पैस्यावर झोडलेल्या शाहीपाहुणचाराची सध्या चर्चा जोरात आहे.
त्यांची कानउघाडणी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केल्यानंतर त्यांनी हॉटेल सोडण्याची तयारी दाखवली.
या सर्वांनी आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख रुपये एवढ्या जनतेच्या पैस्याचा चुराडा ऐषारामासाठी केला आहे
यांनी हॉटेल सोडली असली तरी अजूनही काही खासदार जनतेच्या पैस्यावर हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत
अजूनहि जुन्या खासदारांनी आपली निवस्थाने मोकळी केली नसल्याने तसेच सोडलेल्या निवस्थानांची डागडुजी करायची आहे हि करणे देवून काही खासदार सध्या हॉटेल मुक्कामी आहेत.

आज देशातील सामान्य जनता वेगवेगळ्या प्रश्नाशी झगडत असताना त्यांना २ वेळचे नीट खायला मिळत नसताना त्यांच्या लोकप्रतिनिधींची राहणी कशी असावी असा प्रश्न यावेळी पडतो.
आपल्या देशाच्या संस्कृतीत साधी राहणी आणि उच्च विचार याला महत्व आहे पण आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये नेमके याच्या उलटे आहे त्यांचे म्हणजे उच्च राहणी आणि दिवाळखोर विचार असे आहे.

गांधीजी स्वता आयुष्यभर लज्जारक्षणा एवढे वस्त्र वापरात त्यांनी सर्व सुखसुविधांचा त्याग केला होता ते म्हणत कि देशातील सामान्य जनतेला अंगभर वस्त्र मिळत नसेल तर मला अंगभर वस्त्र घालण्याचा अधिकार नाही.
आजच्या लोकप्रतिनिधींकडून एवढी अपेक्षा नाही आणि फक्त वस्त्रांचे अनुकरण केले म्हणून विचारांचे अनुकरण होते असे काही नाही.
आज देशातील सामान्य जनता विविध समस्याने ग्रस्त असताना जनतेच्या मुलभूत गरजाहि पूर्ण होत नसताना जनतेच्या पैस्यावर आपण असा शाहीपाहुणचार झोडला पाहिजे का? याचा विचार या पुढार्यानी करायला हवा होता
आता काहीजण आम्ही स्वताच्या पैस्यावर हॉटेलमध्ये राहिलो होतो असे सांगण्याचा प्रयन्त करत आहेत पण लोकप्रतिनिधींचे राहणीमान कसे असावे याचे काही संकेत आहेत कि नाहीत कि यांनी सर्व संकेत धाब्यावर बसवले आहेत आता ?
दहशतवादी हल्ला झालेला असतानाहि कपडे बदलण्यात धन्यता मानणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पाटील यांच्या सारखीच सर्व लोकप्रतिनिधींची मानसिकता झाली आहे ?

कामाचा भाग म्हणून सोयीसुविधांचा गरजेपुरता वापर करण्यास कोणाचाच विरोध असणार नाही परंतु सरकारी खर्चाने मिळणाऱ्या सुविधांचा वाट्टेल तसा वापर करणे कितपत योग्य आहे ?

महात्मा गांधी तसेच माजी पंत्रप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी साधेपणालाच महत्व दिले होते याचा आदर्श आपले आजचे लोकप्रतिनिधी कधी घेणार ?

प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या साधेपणाच्या आवाहनाला स्वताला शेतकऱ्यांचे कैवारी आणि सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी हि विरोध करावा हि आश्चर्याची गोष्ट आहे.

आजचे लोकप्रतिनिधी सुखसोयीना महत्व देताना दिसतात तसेच ते सुरक्षा व्यवस्थेला हि प्रतिष्ठा म्हणून समजतात अशाच गोष्टींचा ताण आज पोलीस दलावर येताना दिसत आहे आणि जेथे गरज आहे तेथे सुरक्षा देण्यास ते कमी पडत आहेत.

आज लोकप्रतिनिधी हे आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत हे विसरून गेले असून स्वताला ते राजे एखादे संस्थानिक समजू लागले आहेत अशा लोकांना वेळीच धडा शिकवायला हवा.

आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यावर यांनी 5 star हॉटेलचा त्याग केला असला तरी यापुढे जनतेच्या पैस्यांवर हे लोक कशावरून मजा मारणार नाहीत ???????????

जय हिंद
जय महाराष्ट्र


Reblog this post [with Zemanta]

रविवार, १३ सप्टेंबर, २००९

गुरुजनांचे ऋण!




डॉ. अनिल काकोडकर -अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
जडणघडणीच्या वयात मुलांवर सर्वाधिक प्रभाव असतो तो त्यांच्या घरच्यांचा- आई-वडील, आजी-आजोबा यांचा आणि अर्थातच शिक्षकांचा. शिक्षक म्हणजे घर आणि समाज यातील दुवा. व्यक्तीच्या मूल्यांची आणि विचारांची बैठक तयार होण्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो.
माध्यमिक शाळेत असताना मला गणिताला एक शिक्षक होते. त्यांचं नावच मुळी बुद्धिवंत. हे बुद्धिवंत सर खुर्चीत बसून गप्पा मारीत गणित शिकवायचे. संवाद साधत साधत गणिताचा तर्क समजावायचे. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ते गणित कधी सोडवून व्हायचं, ते समजायचंदेखील नाही. अंकगणित सोडविताना बीजगणिताची पद्धत वापरणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते साध्या, सोप्या रीतीने अंकगणित शिकवत. त्यांनी मला गणिताची गोडी लावली. बुद्धि
Dr Anil Kakodkar Image via Wikipedia
वंत सर गणिताच्या शिकवण्याही घेत. मॅट्रिकच्या वर्षांत असताना मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं, की मीही शिकवणीला येऊ का? सर मला म्हणाले, ‘‘अरे, तुला कोणी सांगितलं शिकवणीला यायला. ज्यांना पास होण्याची शाश्वती नाही, अशांचीच शिकवणी मी घेतो. तुझ्यासारख्या मुलाने शिकवणीला यायची मुळीच गरज नाही. काही अडलं तर जरूर विचारायला ये; पण शिकवणी लावू नकोस.’’ अशा निस्वार्थी बुद्धिवंत सरांची मला नेहमी आठवण येते.
माझ्या जडणघडणीत रुपारेलचे तेव्हाचे उपप्राचार्य भिडे सर यांचं मोठं योगदान आहे. मध्य प्रदेशात खरगोणला शिकलेला मी, मॅट्रिकनंतर मुंबईला आलो. मुंबईच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश हवा होता. मुंबईतला मॅट्रिकचा निकाल लागला; पण आमच्या मध्य प्रदेश बोर्डाचा निकाल काही लागला नव्हता. मग मला प्रवेश मिळण्याची मोठी पंचाईत झाली. एका स्नेह्यांच्या ओळखीतून मी रुपारेल कॉलेजच्या भिडे सरांना भेटायला गेलो. त्यांनी माझी पंचाईत समजून घेतली. त्यांनी विचारलं, ‘तुला किती मार्क मिळतील? फर्स्ट क्लास मिळेल ना?’ मी ‘हो’ म्हणालो. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी मला प्रवेश दिला. फार गवगवा होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बसवून फॉर्म भरून घेतला आणि मी विज्ञान शाखेत दाखल होऊ शकलो. पुढे इंटरला चांगले मार्क मिळाल्यानंतर मी पेढे घेऊन भिडे सरांकडे गेलो. त्यांनी विचारलं, ‘पुढे काय करणारेस?’ मी म्हटलं, ‘बी. एस्सी. करीन- फिजिक्समध्ये’ ते म्हणाले, ‘अरे, तुला चांगले मार्क आहेत. इंजिनीअरिंगला जा.’ तेव्हा इंजिनीअरिंगचे फॉर्मही सायन्स कॉलेजमध्ये मिळत असत. त्यांनी मला तो फॉर्म दिला आणि आग्रहाने भरायला लावला. मी तेवढासा राजी नव्हतो. भिडे सर म्हणाले, ‘इंजिनीअरिंगला जाऊन तर बघ. तुला तिथे अ‍ॅडमिशन नक्की मिळेल’ आणि नाही जमलं तर ये इथे परत. हे कॉलेज तुझंच आहे आणि बी. एस्सी. करायचंच असेल तर फिजिक्समध्ये नाही, मॅथ्समध्ये कर. फिजिक्सला प्रॅक्टिकलचे मार्क असतात. ते किती मिळतील, परीक्षकांवर अवलंबून असतं. गणितात आपण खात्रीने मार्क मिळवू शकतो. बी. एस्सी.ला पहिली श्रेणी मिळाली तरच चांगलं करिअर घडवू शकशील; पण ते नंतरचं. आधी तू इंजिनीअरिंगला जा तर! मी व्ही. जे. टी. आय.ला गेलो ते केवळ भिडे सरांच्या आग्रहामुळे. त्यांचे ऋण मी कसे फेडू?
(हे भिडे सर जर काकोडकरांना भेटले नसते आणि त्यांनी योग्यवेळी योग्य मार्गदर्शन केले नसते तर भारत एका मोठय़ा अणुतज्ज्ञाला मुकला असता!)
हा लेख आजच लोकसत्ता मध्ये वाचनात आला.
Enhanced by Zemanta