"किती रुपये ? " आपण
"४५ सुट्टे द्या " तो
"सुट्टे नाहीत हे पन्नास आहेत " आपण
आणि तो वैतागून एक पावती आणि ५ रुपयांची इक्लेर्स चोकलेट देतो आणि आपण ती गपगुमान घेऊन पुढे चालते होतो.हा रोजचा अनुभव आहे हायवे वरील टोलनाक्यांवरील.
'टोल' या गोष्टीशी कधीही संबंध आला नाही असा माणूस भेटणे आतातरी शक्य नाही असे मला वाटते. टोल प्रकाराने सर्वांनाच त्रस्त केले आहे, माणूस गरीब ,श्रीमंत असो वा वाहतूकदार चालक/मालक सर्वच या टोल पद्धतीला वैतागले आहेत.'टोल' म्हणजे सरकारच्या परवानगीने दिवसा दरोडा टाकणे यातला प्रकार झाला आहे सध्यातरी.या टोलनाक्यांवर जनतेची अक्षरशा लुट चालू आहे.
'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्वावर रस्ते,पूल बांधून त्यावर टोल बसवून त्याचा खर्च तेथून जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य माणसांकडून वसूल करायचा असा हा फंडा आहे. याची सुरवात साधारण २००२ मध्ये पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वर टोल बसवून करण्यात आली.सामान्य माणसालाही चकचकीत रस्ता सुखकर प्रवास यामुळे टोल द्यायला काही वाटत नव्हते.सामान्य माणसाची हीच मानसिकता ओळखून सरकारने हाच फंडा सर्वत्र वापरण्यास सुरवात केली.परंतु अवाढव्य टोल आणि निष्कृष्ट दर्ज्याचे रस्ते आणि टोल नाक्यांचा अतिरेक यामुळे सामान्य माणूस आता वैतागला आहे. त्यामुळेच या टोल पद्धती विरुद्ध आंदोलने होऊ लागली आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने १० टोल नाक्यांवरील टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बाकीच्या टोल नाक्यांचे काय ? राज्यात एकून १७५ टोल नाके आहेत असे बोलले जाते मला यापेक्षा जास्त असावेत असे वाटते कारण एकट्या बारामती मध्ये ३ टोलनाके रिंग रोडवर आहेत २-३ किमी च्या प्रवासासाठी २१ रुपये एवढा टोल येथे वसूल केला जातो.बाकी बेंगलोर- मुंबई एक्प्रेस वे यावर किती टोल नाके आहेत हे फक्त मोजत बसावे.पुणे- मुंबई परतीच्या प्रवासासाठी साधारण ५०० रुपये टोल देवा लागतो,अरे हा टोल आहे कि चेष्टा ?
'बांधा वापरा हस्तांतरित करा' या अंतर्गत खाजगीकरणातून विकास करण्याला विरोध नाही आहे.परंतु हे करताना ते चुकीच्या पद्धतीने किंवा अतिरेक करून करू नये असे मत आहे.एखाद्या कंपनीला त्याचा ठेका दिला तर त्याला ठराविक वर्षासाठी टोल वसुलीचा हक्क दिला जातो . त्यानंतर तो बंद झाला पाहिजे हि रास्त अपेक्षा असते परंतु त्यांना सरळसोट मुदतवाढ दिली जाते.कारण काय तर राजीकीय वरदहस्त, हो हे लपून नाही राहिले कि टोल नाक्यांचे ठेके घेणारे सगळे राजकीय पुढारी किंवा त्यांचे बागलबच्चे आहेत.
तसेच टोल वसूल करणार्यांनी टोल नाक्यांवर काही सुविधा द्यायच्या असतात,रस्त्याची डागडुजी करायची असते या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
टोल देऊन खचखळग्यातून प्रवास करायचा याला आता सामान्य माणूस वैतागला आहे तसेच अजून किती वर्ष हा टोल द्यायचा असा प्रश्न आहेच.कितीतरी रस्त्यावरील टोल त्याचा खर्च निघूनही चालू आहे .परत काही चौकशी करायला गेले तर दादागिरीची भाषा केली जाते काही ठीकानीतर मारहाणीचे प्रकार घडले आहेत.भरपूर ठिकाणी मुदत संपली तरी टोल वसुली केली जाते आपल्या हडपसर येथील टोल नाक्याचेच उदाहरण घ्या त्याची मुदत संपून जमाना झाला पण वसुली चालूच आहे.
खूप टोल नाक्यांवर मोठ मोठे घोटाळे होत आहेत जसे कि नकली पावती दिली जाते,वाहनांची संख्या कमी दाखवली जाते मध्ये एका ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या नकली पावत्या जप्त करण्यात आल्या.हे टोल नाके म्हणजे सामान्य माणसाना लुटण्याचे सरकारी परवानेच आहेत असे मत त्या ठेकेदारांचे झाले आहे.याबाबतच्या तक्रारी सरकार दरबारी जात आहेत परंतु त्याची दखल घेतली जात नाही. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे किती वसुली झाली किती वाहनांनी ये जा केली हे समजणे अगदी सोपे झाले आहे त्याचा वापर करून ठेकेदाराला योग्य तो मोबदला मिळवून देऊन लोकांना या जोखंडातून मुक्त करता येऊ शकते.परंतु हे करण्याची राजकीय इच्छा सरकारच्यात नाही.
याविरुद्ध जोपर्यंत सरकारला जाग येत नाही असे जनआंदोलन उभे राहत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील असे मला वाटते.किंवा 'कधी बंद होणार हे टोलनाके?' असा प्रश्न मनालाच विचारात प्रवास करावा लागेल तोही खड्ड्यातून.
आजकाल ज्याप्रमाणे सरकार चालवले जात आहे, सरकारी अधिकारी वागत आहेत, भ्रष्टाचार गुन्हेगारीकरण वाढले आहे त्यावर उपाय म्हणून सरकारचा हा आवडता फंडाच वापरावा आणि हे सरकार मिलिटरीकडे 'बांधा,वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्वासारखे १५ वर्षासाठी द्यावे म्हणजे ते सुतासारखे सरळ होतील. नाही समजलात ?
म्हणजे कसे आहे ५ वर्षात मिलिटरी सर्व सरकारी बाबू आणि सरकारी योजना यांना योग्य पद्धतीत बांधतील १० वर्ष त्यांचा वापर योग्य होतोय का ते पाहतील आणि नंतर लोकशाहीकडे हस्तांतरित करतील :) कशी आहे आयडिया ?
आणि यासाठी लोक पाहिजे तेवढा टोल स्वखुशीने द्यायला तयार होतील, बघा प्रयोग करून .
सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०
गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०
देवगिरी ... एक मिश्रदुर्ग
लेखक:
विक्रम एक शांत वादळ
टॅग्ज:
इतिहास,
दुर्ग,
देवगिरी,
दौलताबाद,
मिश्रदुर्ग,
daulatabad fort,
devgiri fort,
fort in maharashtra
देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत. अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०
चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह
लेखक:
विक्रम एक शांत वादळ
टॅग्ज:
इतिहास,
गडकिल्ले,
गडकोट,
चाकण,
दुर्ग,
संग्रामदुर्ग,
fort in maharashtra,
sangramdurg
काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.१४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०
रामजन्मभूमी खटला आणि निकाल
रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या ऐतिहासिक खटल्याचा निकाल येत्या 30 तारखेला लखनौ खंडपीठामध्ये ६० वर्षाच्या पदिर्घ कालावधीनंतर लागणार आहे.न्यायमूर्ती एस.यु.खान,डी.व्ही.शर्मा आणि सुधीर आगरवाल हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती निकाल देणार आहेत.जस जसा निकाल जवळ येत आहे तसे सरकारचे टेन्शन आणि सामान्य लोकांच्यात उस्तुकता वाढत आहे. बाबरी पतनानंतर जशी परिस्थिती ओढवली होती तशी ओढवू नये म्हणून सरकार खबरदारी घेत असून सर्वाना शांततेचे आवाहन करत आहे.सर्व मिडीयाला आयताच विषय मिळाल्यामुळे तेथेही दिग्गजांच्या मुलाखतींच्या फैरी झडत आहेत.
तसा हा निकाल अंतिम निकाल आहे असे म्हणता येणार नाही कारण या निकालानंतर निकाल ज्यांच्या विरोधात जाईल त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे.तेथे निकाल लागण्यासाठी किती काळ लागेल हे रामजाने. परंतु याधी सत्र न्यायालयात हिंदूंच्या बाजुनेने निकाल लागला होता.हि लढाई फक्त जागेची नाहीतर अस्मितेची आहे.रामाची जन्मभूमी आयोध्याच आहे का ? हे न्यायालयात पुरावे देऊन साबित करावे लागणार आहे.
काही लोकांच्या मते या खटल्याचा निर्णय न्यायालाच्या बाहेर सामंजस्याने ह्वावा. किंवा तेथे एखादे राष्ट्रीय स्मारक तयार करावे.परंतु 'रामजन्मभूमी' एकच असू शकते ती बदलता किंवा हटवता येणार नाही.विषय फक्त राममंदिराचा असता तर वेगळी गोष्ट होती पण प्रश्न 'रामजन्मभूमीचा' आहे.
न्यायालय बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा निवाडा करू शकते का ???? कारण आयोध्या हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे.हिंदू बाकी कोणत्याहि गोष्टीत एकत्र येतील न येतील परंतु अयोध्या हा असा एक विषय आहे ज्यात ते सर्व जातपात विसरून एकत्र येतात.
रामजन्मभूमी संदर्भातील पहिली केस महंत रघुबीर दास यांनी जानेवारी १९८५ साली दाखल केली होती.त्यानंतर २२ डिसेंबर १९४९ रोजी त्या जागेत रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.डिसेंबर १९५० मध्ये रामजन्मभूमी न्यासाच्या महंत रामचंद्र दास परमहंस यांनी मंदिर बांधणीसाठी केस दाखल केली अशा ऐकून ४ केसेस पेंडिंग आहेत त्यातील एक सुन्नी सेन्ट्रल ऑफ वक्फ यांची आहे.
पुरातत्व खात्याने जे उत्खनन केले आहे त्यात मंदिराचे अवशेष सापडले आहेत आणि ते न्यायालयात सादर हि करण्यात आले असावेत यावर न्यायलय योग्य ते निर्णय घेईलच.तोपर्यंत आपण वाट पाहूयात .आणि निर्णय रामजन्मभूमीच्या बाजूने लागावा म्हणून प्रार्थना करूयात.

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०
विशेषाधिकार आणि काश्मीर
काश्मीर खोरे मागील काही दिवसापासून धुमसत आहे.अगदी ईदच्या दिवशीही तेथील हिंसाचार थांबला नाही.कालसुद्धा कुराण जाळले गेल्याच्या अफवेने हिंसाचार घडला आणि १६ जणांचा मृत्यू झाला. यामागे कोण आहेत हे सर्वांनाच माहिती आहे अगदी सरकारलाही मग ते मुग गिळून का गप्प बसत आहे ? त्या फुटीरवाद्यांना त्यांच्या बिळाच्या बाहेर काढून ठेचत का नाही ? इथे मताची लाचारी यापेक्षा सरकारचा स्वताबद्दलचा विश्वास कमी वाटतो आहे.ते कोणताही ठोस निर्णय घेण्यापासून दूर पळत आहे त्यांना भीती वाटत आहे. कोणाची आणि का ? ते भीत आहेत त्या फुटीरवाद्यांना आणि काही पाकप्रेमी जनतेला.त्यांना मनमानी करून देऊन त्यांचा लाड करून सरकार त्यांना आपलेसे करू पाहत आहे आणि ते कदापि शक्य वाटत नाही.
आताची त्या फुटीरवाद्यांची मागणी आहे ती म्हणजे काश्मीरमधील लष्कराचा विशेषाधिकार कमी करावा. का तर त्याच्या आडून लष्कर मनमानी आणि अत्याचार करत आहेत. त्यात नाहक 'बेकसूर' काश्मिरी तरुण बळी पडत आहेत. यासाठी फुटीरवादी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत आणि हिंसाचार करत आहेत. आता यालाच घाबरून आपले केंद्र सरकार लष्कराचा विशेषाधिकार कमी करावेत का याचा विचार करत आहे.
तर लष्कराचे हे विशेषाधिकार काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. -
देशाचा एखादा भाग केंद्राने 'अस्थिर' जाहीर केल्यानंतर त्या ठिकाणी विघातक शक्तीशी मुकाबला करण्यासाठी लष्कराला विशेषाधिकार दिले जातात.या अधिकारानुसार ५ किंवा जास्त व्यक्ती एकत्र येऊन कायद्याचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे किंवा त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर लष्कर करू शकते.त्याचप्रमाणे अशा जमावाजवळ शस्त्रे असतीलतर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे किंवा त्यांना ठार मारता येते.
एखादी व्यक्ती जर गुन्हा करीत असेल किंवा करण्याचा संशय असेलतर तिला वौरंटशिवाय अटक करता येते.तसेच अशी अटक करण्यासाठी कोणत्याही घरात शिरून शोध घेता येतो किंवा दहशतवाद विरोधी कारवाई करताना अशे घर उद्ध्वस्त करता येते. अशा स्थितीत लष्कराविरुद्ध खटला दाखल करता येत नाही.
तर हा कायदा फक्त काश्मीर पुरताच नसून देशाच्या सर्वच अस्थिर भागासाठी आहे त्यामुळे हाच कायदा ईशान्यकडील राज्यातही लागू आहे. जर हा कायदा काश्मिरात शिथिल वा रद्द केलातर तशीच मागणी बाकी ठिकाणी सुद्धा होऊ शकते आणि तिथेही तो शिथिल करावा लागेल.कारण एकाठिकाणी एक न्याय आणि दुसर्या ठिकाणी दुसरा हे कोणी खपवून घेणार नाही. तसेच हा विशेषाधिकार कमी करून काश्मिरातील हिंसाचार कमी होणार आहे का ? त्याची कोणी हमी घेणार आहे का ? नाही..म्हणजे तशी काही ठाम शक्यता नसताना असे पाऊल उचलणे पूर्णपणे चुकीचे आहे. लष्कराचे हे अधिकार कमी झाले तर त्यांना तिथे दहशतवादी कारवायांना आळा घालणे अक्षरशा मुश्कील होऊन जाईल तसेच स्वताचा बचाव करणे हि जिकीरीचे होऊन बसेल. त्यामुळे तिथे लष्कराला 'जगा आणि जगू द्या' अशी भूमिका घ्यावी लागेल.आणि ते देशाला कदापि परवडणारे नाही.
केंद्र सरकारने तात्पुरत्या फायद्याचा विचार न करता दूरदृष्टी ठेऊन निर्णय घ्याला हवा.नाहीतर याचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागतील आणि ते फक्त काश्मीर पुरते मर्यादित न राहता ईशान्यकडील राज्यातही पाहण्यास मिळतील.
(व्यंगचित्र- सतीश आचार्य )

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०
एक वर्ष झाले सुद्धा ...
लेखक:
विक्रम एक शांत वादळ
मी ब्लॉगिंग सुरु केलं अन् बघता बघता एक वर्ष कसं निघून गेलं हे समजलं
सुद्धा नाही. ब्लॉगला सुरुवात करतांना आपण आपल्या वाचनात आलेले चांगले
लेख फक्त इथे टाकायचे, मग ते कोणत्या वृत्तपत्रातील असो किंवा एखाद्या
संकेतस्थळावरील असो... असे माझे नियोजन होते. तसं मला जास्त अलंकारिक,
कथा वगैरे काही लिहिता येत नसल्याने मी स्वतःचे असे काही लिहू शकेल असे
वाटत नव्हते.
ब्लॉगिंगच्या अगोदर मी ऑर्कुटवर पडीक असायचो आणि तेथील सामाजिक
विषयांवरील धाग्यांवर आपले मत नोंदवायचो, भांडायचो... हे रोजचेच होते.
त्यावेळी ब्लॉग हे काय असते, याचे जास्त ज्ञान मला नव्हते. असाच एकदा एक
प्रोफाईल पाहत असतांना मला त्यात एका ब्लॉगची लिंक दिसली. मी उत्सुकतेने
ती पाहिली आणि मला हा प्रकार चांगला वाटला. आपलाही असाच एक ब्लॉग असावा
असे मनात येऊन गेले आणि मी स्वतःचा ब्लॉग तयार केला. नाव काय द्यावे यावर
डोके चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण फक्त सामाजिक विषयांवर, ज्यात बाकी
लोकांना जास्त रस नसतो किंवा एकदा वाचून सोडून द्यायचे असते अशा विषयावर
लिहणार असतांनाही 'जीवनमूल्य' असं उगाच उपदेशात्मक नाव दिलं. त्यानंतर तो
ब्लॉग "मराठी ब्लॉग विश्व"वर लावण्यासाठी मला काय म्हणून कष्ट करावे
लागले, काय सांगू... कारण मला संगणक या गोष्टीतले शून्य म्हणून ज्ञान
होते .कधी व्यवस्थितरित्या हाताळल देखील नव्हता. मी संगणक आणि नेट फक्त
माझ्या शेअर ट्रेडिंग साठी घेतले होते आणि त्या वेळात मी नेटवर भटकत
असायचो, तेवढंच काय ते मला येत होतं. कोणत्याही ब्लॉग धारकाला आपला ब्लॉग
कोणीतरी वाचवा असे वाटत असते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या
असतात. त्यासाठी मी माझ्या नवीन पोस्टची लिंक माझ्या ऑर्कुट मित्रांना
मेसेज करायचो, त्यातील काही वाचायचे, काही प्रतिक्रिया द्यायचे, तेवढाच
थोडासा दिलासा...
ब्लॉग सुरु केल्यानंतर मी बाकीचे मराठी ब्लॉगही वाचायला लागलो. मराठी
ब्लॉग विश्ववरून, काही दिवस असे गेल्यानंतर मला विविध ब्लॉगवरील
टेम्प्लेटने भुरळ घातली. आपलाही ब्लॉग असाच सजवलेला असावा असे वाटू लागले
पण त्यातील अक्कल नसल्याने काही करता येत नव्हते आणि तेवढ्यात
भुंग्याने नवीन टेम्प्लेटबद्दल एक पोस्ट टाकली असावी आणि आम्ही त्याला
प्रतिक्रिया देत त्याबद्दल प्रश्न विचारू लागलो पण HTML मधील काहीही
ज्ञान नसल्याने माझ्या ते डोक्यावरून जात होते, मग 'भुंग्या' दादाला
त्रास सहन होईना, आणि त्याने माझा ब्लॉग स्वतःहून सजवून दिला, तेही
त्याच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आणि मला माझा पहिला ब्लॉग मित्र
मिळाला... त्यानंतर माझ्या पोस्टवरील पहिली प्रतिक्रिया असायची ती
भुंग्या दादाची आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळायचे. मग त्यानंतर ओळख
झाली ती विशल्याची, याने आता आपल्या ब्लॉग ची 'सुरुवात' केलीय की शेवट
केलाय हा प्रश्न आहेच म्हणा, पण याचेही मी खूप डोके खाल्ले आहे आणि आताची
टेम्प्लेट ही याचीच देन आहे. त्यानंतर पंक्याच्या 'भटकंतीने' वेड लावले
याची फोटोग्राफी म्हणजे भन्नाट काम... आपण फिदा आहे त्यावर, रोहनचा तसा
थोडासा परिचय होता ऑर्कुटमुळे पण त्याचे ब्लॉग वाचून आणि महाराजांबद्दलचे
ज्ञान पाहून खरच मानलं या मावळ्याला... एकदम जबरदस्त अभ्यास असणारा
माणूस, त्यात आमच्यासारखाच हुंदडण्यात आनंद मानणारा... महेंद्र काकांच्या
ब्लॉगेस्टिकनंतर त्यांच्या ब्लॉगवर जास्त जाने झाले ते 'काय वाट्टेल ते '
लिहित गेले आणि आम्ही वाचत गेलो अगदी मंत्रमुग्ध होऊन... त्यात त्या
सत्यवानाची 'वटवट' मधेच त्रास द्यायची, कधी हसवायची, तर कधी विचार करायला
लावायची... त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या बाळराजांनी मग काय त्या
ब्लॉगची बातच कुछ और होऊन गेली. कधी कधी 'माझिया मना'ची साद ऐकू यायची
आणि मी तिकडे जायचो.
कधी खूप उदास झालो कि 'माझ्या गजाल्या' असायच्या. कधी सुवासिक 'मोगरा
फुलला' की तिकडे भटकून यायचो. तुम्ही त्या 'सौरभ'चा ब्लॉग पहिला आहे का
एकदम जबऱ्या माणूस, पाहिजे तसे कशावरही लिहू शकतो तेही माणसाला खेळवून
ठेवत, त्याच्यात खूप काही आहे असे मला सारखे वाटते. याच्या मित्राची
'बक-बक' सुद्धा मस्त असते.
या ब्लॉगिंगमुळेच ट्विटरकडे ओढलो गेलो. आता तिथेच पडीक असतो दिवसभर...
यातून नवनवीन मित्र मिळाले, खूप काही चांगले वाचयला मिळाले. आजकाल मी
आनंदच्या 'मनात काय आहे' ते पाहत असतो तसेच 'बाबाची भिंत' चढून त्यामागे
काय चालले आहे तेही पाहत असतो. कधी निवांत बसायचे असेल तर सागरचा 'सागर
किनारा' आहेच की...
याच काळात मला मराठी ब्लॉगर्सच्या "पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा" साठी
जाण्याचा योग आला, परंतु जास्त कोणाशी ओळख नसल्याने फक्त भुंग्या दादाशी
गप्पा मारल्या.. पंक्या आपला फोटो काढून घेण्यात व्यस्त होता. दीपक दादा
दिसायला राक्षसासारखा असला तरी खूप प्रेमळ आहे बरं का...!! ;) तर असे
दिवस चालू आहेत कधी काही सुचले तर लिहित असतो... मी साधारण सामाजिक
विषयांवर सडेतोड लिहिण्याचा प्रयत्न करतो... काही लोकांना आवडतं, काहींना
आवडत नसावे, पण आपले मत व्यक्त करत असतो.
तुम्हासारख्या मराठी ब्लॉगर्सचे आणि वाचकांचे प्रेम मिळाले यात खूप
समाधानी आहे. असेच काही-बाही लिहित राहील, वाचत राहा... चुकलो तर चूक
दाखवत जा. तुमचे प्रेम हेच सर्व काही आहे :)
जय महाराष्ट्र!

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)